Published On : Thu, Oct 1st, 2026
By Nagpur Today Nagpur News

पावसाळ्याने दिला दगा; विदर्भात २७ टक्के पावसाची तूट, ८ जिल्हे दुष्काळाच्या छायेत

-अमरावतीत सर्वाधिक ४३ टक्के, अकोल्यात ४१ टक्के तूट; नागपूर-वर्ध्यातही ३४ टक्के कमी पाऊस
Advertisement

Nagpur Rain Alert Ends Monday as Rain Intensity Expected to Ease

नागपूर : यंदाचा पावसाळा विदर्भासाठी निराशाजनक ठरला आहे. १ जून ते ३० सप्टेंबरदरम्यान विभागात सरासरीच्या तुलनेत तब्बल २७ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. ११ पैकी १० जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असून, आठ जिल्हे कोरड्या दुष्काळाच्या छायेत आले आहेत.

विदर्भात या कालावधीत ६८७.३ मिमी पाऊस झाला, तर सरासरी ९३७.३ मिमी पावसाची अपेक्षा होती. त्यामुळे सुमारे २५० मिमी पावसाची तूट निर्माण झाली आहे. अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक ४३ टक्के, तर अकोल्यात ४१ टक्के पावसाची तूट नोंदवण्यात आली आहे.

नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांतही सरासरीपेक्षा प्रत्येकी ३४ टक्के कमी पाऊस झाला. वाशिममध्ये ३७ टक्के, चंद्रपूरमध्ये ३३ टक्के, यवतमाळमध्ये २७ टक्के आणि बुलढाण्यात २१ टक्के पावसाची तूट आहे.

पावसाचे वितरण पाहता भंडारा, गडचिरोली आणि गोंदिया हे तीन जिल्हे सामान्य श्रेणीत आहेत. गोंदियात केवळ एक टक्का तूट असून, भंडारा आणि गडचिरोलीत प्रत्येकी १६ टक्के तूट नोंदली गेली आहे.

Advertisement

दरम्यान, मान्सूनने उत्तर भारतातून परतीचा प्रवास सुरू केला आहे. विदर्भातून साधारणतः ५ ते १० ऑक्टोबरदरम्यान मान्सून माघारी फिरतो. यंदा मात्र मान्सून निर्धारित वेळेपूर्वीच विदर्भातून निघण्याची शक्यता आहे. परतीच्या पावसासाठी सध्या अनुकूल हवामान प्रणाली विकसित झालेली नसल्याने आगामी दिवसांतही मोठ्या पावसाची शक्यता कमी असल्याचे चित्र आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.