नागपूर : जुलै २०२६ मध्ये मान्सूनने विदर्भात दमदार पुनरागमन करत सर्वदूर मुसळधार पाऊस बरसवला. हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, विदर्भात जुलै महिन्यात ३७४.१ मिमी पावसाची नोंद झाली असून, ही सरासरी ३०९.३ मिमीच्या तुलनेत २१ टक्के अधिक आहे.
अमरावती वगळता विदर्भातील उर्वरित ११ जिल्यांत सरासरीइतका किंवा त्यापेक्षा अधिक पाऊस झाला. गोंदिया जिल्यात सर्वाधिक ६६८.३ मिमी पाऊस झाला असून तो सरासरीपेक्षा ५६ टक्के अधिक आहे. त्यानंतर बुलढाणा आणि यवतमाळ येथे प्रत्येकी ५१ टक्के अधिक पावसाची नोंद झाली.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, भंडारा येथे ४८२.६ मिमी (३३ टक्के अधिक), वर्धा येथे ३३०.५ मिमी (२१ टक्के अधिक), गडचिरोली येथे ५१९.८ मिमी (१९ टक्के अधिक), वाशीम येथे १४ टक्के, नागपूर येथे ६ टक्के, अकोला येथे ५ टक्के आणि चंद्रपूर येथे २ टक्के अधिक पाऊस झाला.
मात्र, अमरावती जिल्यात यंदाही सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली. जिल्यात सरासरी २६८ मिमीच्या तुलनेत २४६.६ मिमी पाऊस झाला असून तो ८ टक्के कमी आहे.
जुलै महिन्यात झालेल्या या समाधानकारक पावसामुळे विदर्भातील प्रमुख धरणे आणि जलाशयांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे खरीप पिकांना मोठा दिलासा मिळाला असून आगामी काळात सिंचन आणि पिण्याच्या पाण्याची उपलब्धताही सुधारण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हवामान विभागाच्या मते, पुढील काही दिवसही पावसाचा जोर कायम राहिल्यास कृषी क्षेत्राला त्याचा मोठा फायदा होणार आहे.
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
निर्मल उज्ज्वल के प्रमोटर के घर पहुंचे जमाकर्ता | "हमारा पैसा वापस...
NagpurCrime : नागपुर में काली बाइक गैंग का आतंक; एक दिन में...
Amravati: दर्यापुर के ज्वेलर्स में हथियारबंद डकैती #Amravati #jewellery #Robbery #Crime #Robbery
Nagpur: Cotton Market की सद्गुरु सेल्स में भीषण आग #Nagpur #NagpurNews #FireAccident...
Nagpur: हिस्ट्रीशीटर पुलिस कस्टडी से फरार #Nagpur #NagpurNews #HistorySheeter #PoliceCustody #Crime




