Published On : Tue, Apr 23rd, 2019

विदर्भ एक्स्प्रेसच्या प्रवाशाला ८ हजार केले परत

Advertisement

लोहमार्ग पोलिसांची तत्परता

नागपूर: विदर्भ एक्स्प्रेच्या प्रवाशाचा चुकून बर्थवर राहीलेला पर्स लोहमार्ग पोलिसांनी शोधून परत केला. या पर्स मध्ये रोख ८ हजार आणि महत्वाची कागदपत्रे होती. पर्स मिळताच प्रवाशाने आनंद व्यक्त करून पोलिसांचे आभार मानले. पोलिसांनी आपला कर्तव्यदक्षपणा आज सोमवारी दाखविला. त्यांच्या प्रामाणिकतेमुळे प्रवाशांचा पोलिसांवरील विश्वास वाढत आहे.

बिलासपूरचे व्यापारी रीतेश पटेल (३७) हे मुंबई गोंदिया विदर्भ एक्स्प्रेसने बी-१ बोगीतील ३९ बर्थवरू मनमाड ते नागपूर असा प्रवास करीत होते. नागपुरात त्यांची सासुरवाडी असल्याने ते भेटीसाठी जात होते. त्यांनी डोक्याखाली पर्स ठेवला होता. सकाळी ९ वाजताच्या सुमारास नागपूर रेल्वे स्थानकावर गाडी पोहोचल्यानंतर उतरण्याच्या धावपळीत ते पर्स विसरले आणि सासूच्या घरी निघून गेले. घरी गेल्यावर पर्स नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांची शोधाशोध केली. मात्र, पर्स मिळाला नाही. अखेर त्यांनी लोहमार्ग पोलिस ठाणे गाठून सारा प्रकार सांगितला. कर्तव्यावर असलेल्या महिला पोलिस नायक अश्विनी रिणके यांनी लगेच गोंदिया लोहमार्ग पोलिसांसी संपर्क साधला. वेळ न दवळता एएसआय गजानन थोरात आणि हवालदार निलेश बारड यांनी नमुद बोगीत शोधाशोध सुरू केली. नागपूर ते गोंदियापर्यंत गाडी जावूनही पर्स बर्थवरच होते. थोरात यांनी पर्स ताब्यात घेतला आणि नागपुरात पोहोचले. पर्स मिळाल्याची माहिती पटेल यांना दिली. लागलीच पटेल हे लोहमार्ग ठाण्यात पोहोचले. खात्री पटविल्यानंतर पर्स त्यांच्या सुर्पर्द करण्यात आला. पर्स मिळाल्याचा आनंद त्यांच्या चेहºयावर होताच. त्यांनी लोहमार्ग पोलिसांचे आभार मानले. ही कामगीरी ठाणेदार कीरण सावळे यांंच्या मार्गदर्शनात करण्यात आली.