‘विदर्भ बंद’ नागपुरात ट्रक जाळला, बसच्या काचा फोडल्या…


नागपूर: राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विदर्भ राज्य आंदोलन समितीने बंदची हाक दिली आहे. नागपुरातील व्हरायटी चौकात विदर्भवादी नेते आणि कार्यकर्त्यांनी धरणे धरले. यावेळी कार्यकर्त्यांनी वेगळ्या विदर्भाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली.हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. विविध मुद्द्यांवरून सरकारविरोधात विरोधक आक्रमक झाले आहेत. तर दुसरीकडे विदर्भ बंदची हाक देणारे नेते आणि कार्यकर्तेही आक्रमक झाले आहेत. आज सकाळीच मोठ्या संख्येने विदर्भवादी नेते आणि कार्यकर्ते नागपुरातील सिताबर्डी परिसरात एकत्र आले. त्यांनी वेगळ्या विदर्भाच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली.

वेगळ्या विदर्भाचे गाजर दाखवत सत्तासींन होणाऱ्या भाजपा ने विदर्भाच्या मुद्द्यावर शिवसेने पुढे घुडगे टेकत विदर्भ वासीयांच्या तोंडाला पाने पुसली,या दगाबाजीच्या विरोधात आपले आंदोलन तिव्र करत आज विदर्भ बंद ची हाक दिली आहे.या औचित्याने नागपुरात झालेल्या काही घटनांवरून हे आंदोलन हिंसक वळण घेणार असल्याची चिन्हे आहेत.


वेगळ्या विदर्भाच्या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी कळमना येथे उभ्या ट्रकला पेटवून देण्यात आले. जगनाडे चौकात एस.टी. बस .च्या काचा फोडल्या तर काही ठिकाणी रोड वर टायर जाळून मार्ग अवरुद्ध करण्याचा प्रयत्न केला.दरम्यान आज विदर्भ बंदीची हाक देत विदर्भवादी नेत्यांनी हा बंद यशस्वी करण्यासाठी काळापासूनच मोर्चे बांधणी सुरु केली होती. वेगळ्या विदर्भाचे आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या भाजप सरकारची कानउघडणी करण्यासाठी या विदर्भ बंदची हाक विदर्भवादी नेत्यांनी दिली आहे. त्या हाकेला ओ देतांना विदर्भवादि कार्यकर्त्यांनी या बंदला पाठींबा देण्यासाठी आणि शासनाचे ध्यनाकर्षण करण्यासाठी हिंसक मार्गाचा अवलंब केल्याचे बोलल्या जात आहे.गोंदिया जिल्ह्यात मात्र विदर्भबंद फसला असून जिल्ह्यात सर्वत्र व्यवहार आणि वाहतुक सुरळीत सुरु आहे.