जखमी अवस्थेतही खासदार सुप्रिया सुळे यांचा पदयात्रेत सहभाग; कार्यकर्त्यांचा वाढवला उत्साह

Advertisement

NCP MP Supriya Sule in Padyatra
नागपूर: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने खोटारडया सरकारच्याविरोधात सुरु केलेल्या हल्लाबोल पदयात्रेतील रास्तारोको आंदोलनात पोलिसांनी केलेल्या झटापटीमध्ये खासदार सुप्रिया सुळे जखमी झाल्या आहेत.मात्र तरीही दुखापतीची पर्वा न करता खासदार सुप्रिया सुळे पदयात्रेमध्ये सहभागी झाल्या आहेत.

अकराव्या दिवशी हल्लाबोल पदयात्रेचे नागपूर शहरामध्ये आगमन होण्यापूर्वी प्रवेशद्वारासमोरच खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना ताब्यात घेताना नागपूर पोलिसांनी केलेल्या झटापटीमध्ये हा प्रकार घडला.

आजपासून अधिवेशन सुरु झाले आणि भाजप-शिवेसेनेला कर्जमाफी आणि इतर विषयावर कोंडीत पकडत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी, आमदारांनी विधानभवन दणाणून सोडले. त्यामुळे दोन्ही सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकुब करावे लागले.

त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, विधीमंडळ पक्षनेते अजित पवार,विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे,माजी मंत्री जयंत पाटील,माजी मंत्री अनिल देशमुख, पक्षाचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे,आमदार हेमंत टकले, आदींसह सर्व आमदारांची फौज हल्लाबोल पदयात्रेमध्ये सहभागी झाल्याने हल्लाबोल पदयात्रेमध्ये एक वेगळाच हुरुप आला.


दुपारी नागपूरमधील शरद पवार कॉलेजमध्ये विश्रांती घेतल्यानंतर पदयात्रेला सुरुवात झाली. यावेळी हल्लाबोल पदयात्रेमध्ये महिला राष्ट्रीय अध्यक्षा फौजिया खान,माजी मंत्री गुलाबराव देवकर,माजी मंत्री भास्कर जाधव,महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, आमदार राणा जगदिशसिंह,आमदार विदया चव्हाण,आमदार शशिकांत शिंदे,आमदार भाऊसाहेब चिकटगावकर,आमदार जयदेव गायकवाड,आमदार सतिश चव्हाण, आमदार प्रकाश गजभिये,आमदार जयवंत जाधव,आमदार सतिश पाटील,आमदार नरहरी झिरवळ,रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अदिती तटकरे,संजय तटकरे,संजय बोरगे,माजी आमदार संदीप बजोरिया,माजी आमदार आणि नागपूर जिल्हाध्यक्ष रमेश बंग,माजी आमदार गुलाबराव गावंडे,माजी आमदार सुरेश देशमुख, युवा नेते सलील देशमुख,माजी खासदार आनंद परांजपे, बसवराज नागराळकर-पाटील,नागपूर जिल्हा कार्याध्यक्ष राजाभाऊ टाकसाळे ,महिला जिल्हाध्यक्षा उज्वला बोराडे, यवतमाळ जिल्हाध्यक्ष नानाभाऊ गाडबैले,महिला जिल्हाध्यक्षा क्रांती धोटे-राऊत,वर्धा जिल्हाध्यक्ष सुनिल राऊत,महिला जिल्हाध्यक्षा शरयू वांदिले, पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे, युवकचे प्रदेश उपाध्यक्ष समीर देशमुख,ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे,मुंबई युवकचे अध्यक्ष निलेश भोसले आदींसह नागपूर जिल्हयातील पदाधिकारी,कार्यकर्ते,युवक कार्यकर्ते,युवती कार्यकर्त्या, शेतकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्यातील सर्व नेते,पदाधिकारी,कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.