उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचे विमानतळावर आगमन व स्वागत
नागपूर: उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचे भारतीय हवाई दलाच्या विशेष विमानाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर सकाळी 10.15 वाजता आगमन झाले. यावेळी महापौर श्रीमती नंदाताई जिचकार यांनी उपराष्ट्रपतींचे स्वागत केले.
विमानतळावर खासदार डॉ. विकास महात्मे, एअर मार्शल आर. के. एस. शेरा, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक के. एम. मल्लिकार्जुन प्रसन्ना, जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचे स्वागत केले.
विमानतळावरील स्वागताचा स्वीकार केल्यानंतर राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्था (निरी) तर्फे आयोजित 15व्या आंतरराष्ट्रीय जिव विज्ञान, चिकित्सा आणि पर्यावरणामध्ये धातू आयरन व कार्बनिक प्रदूषण यावर आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभासाठी रवाना झाले