
नागपूर: उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांचे आज हैद्राबादहून विमानाने दुपारी 10.10 वाजता आगमन झाले. यावेळी विमानतळावर त्यांचे स्वागत पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केले. यावेळी खासदार डॉ. विकास महात्मे, महापौर संदीप जोशी यांच्यासह विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी, रविंद्र ठाकरे, पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, एअर मार्शल शशिधर चौधरी उपस्थित होते.
विमानतळावरील स्वागताचा स्वीकार करुन उपराष्ट्रपती सुरेश भट सांस्कृतिक सभागृह, रेशीमबाग कडे रवाना झाले.
Advertisement








