Published On : Sat, Jan 11th, 2020

जिल्ह्यात मोठे उद्योग येण्यासाठी प्रारूप तयार करा – राऊत

Advertisement

जनतेच्या अपेक्षा पुर्ण करण्यासाठी काम करणार
विकासकामांचा घेतला आढावा

नागपूर: नागपूर हे विदर्भातील उपराजधानीचे शहर आहे. अंभियांत्रीकी व अन्य व्यावसायिक शिक्षण घेवून बाहेर पडणा-या उच्च शिक्षित तरूणांना रोजगारांच्या संधी उपलब्ध होण्यासाठी जिल्ह्यात मोठे उद्योग उभारावे लागतील .या दृष्टीने उद्योग उभारणीसाठी प्रारूप तयार करण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज उद्योग विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

Gold Rate
15 july 2025
Gold 24 KT 98,200 /-
Gold 22 KT 91,300 /-
Silver/Kg 1,12,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

राज्याचे उर्जामंत्री व नागपूरचे पालकमंत्री डॉ .नितीन राऊत यांनी पदभार स्वीकारल्यानंतर जिल्हयातील विकासकामांचा आज जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे आढावा घेतला. नविन वर्षाच्या शुभेच्छांनी त्यांनी बैठकीला सुरूवात केली.

मुंबई: पुण्या व्यतीरीक्त विदर्भात मोठे उद्योग यावे म्हणून उद्योगस्नेही वातावरण तयार करण्याचा शासनाचा प्रयत्न असेल. तसेच यासाठी विदर्भ सारख्या उदयोग परिषदा घेण्याचा शासनाचा मानस आहे.

सर्वसाधारण योजनेचा जिल्ह्याचा 876 कोटी रूपयांचा मंजूर आराखडा असून आतापर्यत 67 टक्के खर्च झाला आहे. तर अनुसूचित जाती –जमाती योजनेत 50 टक्के खर्च झाला असल्याची माहीती जिल्हा नियोजन अधिकारी श्री. नारींगे यांनी यावेळी दिली. 50 टक्क्याहून कमी निधी खर्च झालेल्या विभागांच्या कामाची माहीती यावेळी पालकमंत्र्यांनी घेतली. यावेळी रस्ते विकास व सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी निधी विहीत पध्दतीने व वेळेत खर्च करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

जनतेच्या अडचणी सोडविण्यावर भर देणार असल्याचे सांगून पालकमंत्री म्हणाले, नागरिकांच्या विकास कामाबाबत असलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी काम करायचे आहे.

जिल्हा नियोजन अधिकारी मिलिंद नारींगे यांनी यावेळी जिल्ह्यातील सुरू असलेल्या विकास कामांची संक्षिप्त स्वरूपात मांडणी केली.

जनतेच्या अपेक्षानुसार काम करण्याची संधी मिळाली आहे. नागपूर जिल्ह्याच्या विकासासाठी पालकमंत्री म्हणून कटिबध्द असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. शहराच्या किंवा जिल्ह्याच्या विकासाचे महत्वाच्या बाबी शासनाकडे प्रलंबित असल्यास त्याचा ही पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी आश्वस्त केले. यावेळी महत्वाचे उद्योग व स्वयंरोजगाराच्या संधी, शहरातील घनव्यवस्थापन,सार्वजनिक स्थळांचे सौदर्यीकरण तसेच शहरातील वाहनांची वाढती संख्या व त्यादृष्टीने पार्कीगची व्यवस्था करण्यावर भर दिला पाहीजे, असे त्यांनी निर्देशित केले.

जिल्हा उद्योग कार्यालयाच्या वतीने चालविण्यात येणा-या योजनांचा ही धावता आढावा त्यांनी यावेळी घेतला. कौशल्य विकास, उद्योग विभाग यांनी संयुक्तपणे काम करून रोजगारांच्या संधी व प्रशीक्षण युवकांना द्यावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

वाढत्या सायबर गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी पोलीस विभागाने काम करावे. तसेच स्मार्ट सिटीबाबत लवकरच वेगळी बैठक घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

बैठकीच्या शेवटी सामान्य नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर लोकाभिमुख पध्दतीने काम करण्यासाठी अधिकाऱ्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले.

बैठकीच्या प्रारंभी जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांच्या सह पोलीस आयुक्त डॉ .भूषणकुमार उपाध्याय व पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांचे स्वागत केले.

या बैठकीला जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे,महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर , पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय ,जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक राकेश ओला, नागपूर सुधार प्रन्यासचे अप्पर आयुक्त हेमंत पवार यासह विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement