Published On : Thu, Mar 8th, 2018

ज्येष्ठ पत्रकार अनिल महात्मे यांचे निधन

Advertisement

Anil Mahatme
नागपूर: येथील ज्येष्ठ पत्रकार अनिल हरिभाऊ महात्मे यांचे गुरुवारी (दि़ ८) मध्यरात्री साडेबारा वाजता हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले़ ते ६७ वर्षांचे होते़ त्यांच्यामागे पत्नी डा़ॅ आसावरी महात्मे, मुलगा अभिनंदन, दोन मुली अनुभूती व डॉ. प्रज्ञा देवव्रत बेगडे आणि नातवंडासह बराच मोठा आप्तपरिवार आहे़.

श्री़ महात्मे हे अमरावती जिल्’ातील वरुड येथील मूळचे होते़ त्यांनी नागपूरातील महासागर या दैनिकातून पत्रकारितेला सुरवात केली़ त्यानंतर नागपूर पत्रिकेत वरिष्ठ पदावर कार्यरत होते़ त्यानंतर निर्मल महाराष्ट्र, जनवाद आणि सकाळमध्ये काम केले़ मध्यंतरी त्यांनी दखल नावाचे साप्ताहिकही चालविले़ त्यांनी आपल्या कारकिर्दीत कृषी पत्रकारितेला नवा आयाम दिला़ तेव्हापासून वृत्तपत्रात कृषीविषयक बातम्या तसेच स्तभांना स्थान मिळू लागले़ याच निमित्ताने त्यांनी इस्त्राइलचा दौरा केला़ त्यांना कृषी मित्र पुरस्कार प्राप्त झाला होता़ साठी ओलांडल्यानंतरही त्यांनी शिकण्याची जिद्द सोडली नाही़ नुकतीच दोन वर्षांपूर्वी त्यांनी पत्रकारितेची पदवी पूर्ण केली़ त्यांनी कृषी संपदा, रायटरमध्येही त्यांनी काम केले़ अनेक संस्था संघटनांसह नागपूर श्रमिक पत्रकार संघाचे पदाधिकारी राहिलेत़ अनिल महात्मे यांनी अनेक वषार्पासून जवळपास ३ दशके पर्यावरण व वन्यजीव शिक्षण व संरक्षणाचे क्षेत्रातही मोलाचे योगदान दिले़ ते विदर्भ निसर्ग संरक्षण संस्थेचे संस्थापक सदस्य व अध्यक्ष होते. त्याचप्रमाणे नागपूर शहरात कर्णबधिरांसाठी समर्पित मूक आणि बधिर औद्योगिक संस्थेचे कार्यकारिणी सदस्य होते.

त्यांच्या पत्रकार सहनिवास, महाराजबाग या निवासस्थानाहून अंत्ययात्रा निघाली वअंबाझरी घाटावर विद्युत शवदाहिनीत त्यांच्यावर दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले़ शोकसभेच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री रणजित देशमुख होते़ यावेळी डॉ़ शरद निंबाळकर, तानाजी वनवे, रमेश गजबे, जैन समाजाचे मारोतकर, विजय जावंधिया, प्रा़ शरद पाटील, शरद चौधरी, तुषार कोहळे, विनोद देशमुख, श्री खान नायडू, विलास कालेकर, प्रा़ भाऊ भोगे, श्रीनिवास खांदेवाले, दिलीप गोडे, ज्येष्ठ पत्रकार जोसेफ राव, श्रीपाद अपराजित, भास्कर लोंढे, दिलीप तिखिले यांची उपस्थिती होती़ यावेळी इंडियन मीडिया जर्नालिस्टचे बाला भास्कर आणि इंडियन फे डरेशन आॅफ वर्कींग जर्नालिस्टचे विक्रम राव यांनी भ्रमणध्वनीवरून शोकसंवेदना व्यक्त केल्या़ यासह राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांसह पत्रकारिता, माहिती व जनसंपर्क खात्यातील अधिकाºयांची उपस्थिती होती़ शोकसभेचे संचालन प्रा़ जवाहर चरडे यांनी केले़

मुख्यमंत्री यांच्या शोकसंवेदना
अनिल महात्मे यांनी पत्रकारितेत दिलेले योगदान मोलाचे आहे. एक साक्षेपी संपादक आणि व्यासंगी लेखक म्हणून ते कायम स्मरणात राहतील. अशा शोकसंवेदना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या आहे. विदर्भाच्या शेतीसह विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी स्वर्गीय अनिल महात्मे यांचे लिखाण महत्त्वाचे ठरले आहे. तसेच संपादक आणि कृषी या विषयासंदर्भातही व्यासंगी लेखक म्हणून त्यांची वेगळी ओळख आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजून दु:ख झाले आहे. त्यांच्या निधनाचे दु:ख सहन करण्याची ताकद त्यांच्या कुटुंबीयांमध्ये येवो, अशा शोक संवेदना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या आहेत.

पत्रकार संघटनांच्या शोकसंवेदना
श्री़ महात्मे यांच्या निधनाबद्दल पत्रकारांच्या विविध संघटनांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या़ नागपूर युनियन आॅफ वर्किंग जर्नालिस्ट्स अध्यक्ष ब्रम्हाशंकर त्रिपाठी, टिळक पत्रकार भवन ट्रस्टचे अध्यक्ष प्रदीप कुमार मैत्र, टीपीबी ट्रस्टचे महासचिव शिरीष बोरकर, टीपीबी ट्रस्टचे कोषाध्यक्ष जोसेफ राव यांनीही जुन्या आठवणींना उजाळा दिला़ महात्मे यांनी शेतकरी, विदर्भातील ग्रामीण भागातील समस्या आणि उर्वरित महाराष्ट्रातील ज्वलंत प्रश्नांवर आपल्या लेखनीतून प्रकाश टाकला. १९८०च्या दशकाच्या सुरुवातीस शेतकºयांसाठी विपूल लिखाण केले़ त्यांनी याच काळात पत्रकार संघटनेच्या सहकार्याने पत्रकार आणि गैरपत्रकारांसाठी विविध वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसाठी झालेल्या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला होता़.