नागपूर: राज्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या स्वयं/समूह पुनर्विकासासाठी स्थापन केलेल्या नव्या स्वयंपुनर्विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी विधान परिषद सदस्य प्रवीण दरेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीबरोबरच त्यांना मंत्रिपदाचा दर्जाही देण्यात आला आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशातून स्पष्ट करण्यात आले आहे.
शासन निर्णयातील प्रमुख तरतुदी खालीलप्रमाणे आहेत:
- प्राधिकरणाची स्थापना: राज्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासासाठी विशेष प्राधिकरण स्थापन करण्यात आले आहे.
- अध्यक्षपदाची नियुक्ती: प्रवीण दरेकर यांना अध्यक्षपदी नेमण्यात आले असून त्यांना मंत्रिपदासमान दर्जा देण्यात आला आहे.
- भत्ते आणि सुविधा: दरेकर यांना मंत्रिपदाच्या दर्जानुसार वित्त विभागाच्या १३ मार्च २०१२ च्या शासन निर्णयानुसार भत्ते आणि सुविधा म्हाडा मार्फत दिल्या जातील.
- म्हाडाची भूमिका: म्हाडा प्राधिकरणाला या प्राधिकरणासाठी समन्वय संस्था (नोडल एजन्सी) म्हणून कार्य करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
- प्रशासकीय व्यवस्था: अध्यक्ष कार्यालयासाठी जागा, कर्मचारी नेमणूक आणि इतर प्रशासकीय बाबी म्हाडा मार्फत त्यांच्या खर्चातून पूर्ण केल्या जातील.
या निर्णयामुळे प्रवीण दरेकर यांना केवळ अधिकारच मिळाले नाहीत तर राज्यातील गृहनिर्माण पुनर्विकास प्रकल्पांवर त्यांचा प्रभावही वाढणार आहे, अशी मतस्थानिक राजकीय समीक्षकांची मते आहेत.