Advertisement

नागपूर : हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री आणि पद्मश्री पुरस्कारप्राप्त आशा पारेख यांनी आज कोराडी येथील श्री महालक्ष्मी जगदंबा मंदिराला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी आई जगदंबेचे मनोभावे दर्शन घेतले आणि देवीचा आशीर्वाद घेतला.
मंदिर संस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन आशा पारेख यांचे स्वागत व सत्कार केला. यावेळी मंदिराची भव्य वास्तू, परिसरातील स्वच्छता, सुंदरता तसेच भाविकांसाठी करण्यात आलेल्या सोयी-सुविधांची माहिती घेऊन त्यांनी समाधान व्यक्त केले. मंदिर परिसरातील उत्तम व्यवस्था आणि सुंदरतेचे त्यांनी विशेष कौतुक केले.
आशा पारेख यांच्या या सदिच्छा भेटीमुळे मंदिर संस्थानच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. याप्रसंगी मंदिर संस्थानचे पदाधिकारी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.



