Published On : Fri, Jul 12th, 2019

बुलंद इंजिन टाकतेय कात

रंगरंगोटीने आता नव्या स्वरूपात

नागपूर: दिडशे वर्षांचा इतिहास रेल्वेने जपून ठेवला आहे. त्यातील एक म्हणजे बुलंद इंजिन. नागपूर रेल्वे स्थानकाच्या अगदीच समोर असलेल्या बुलंद इंजिनने लाखो प्रवाशांना त्यांच्या नियोजित स्थळी पोहोचविले आहे. हा इतिहास प्रवाशांसमोर यावा म्हणून मध्य रेल्वे नागपूर विभागाने बुलंद इंजिनची येथे स्थापना केली. अलिकडेच या इंजिनची रंगरंगोटी होत असल्याने इंजिन नव्या रंगाढंगात प्रवाशांना पाहायला मिळणार आहे.

भारतीय रेल्वेचा इतिहास हा पुरातन तितकाच वैभवशाली आहे. १८५३ मध्ये भारतीय रेल्वे सुरू झाल्यानंतर दि ग्रेट पेननसुएला कंपनीने रेल्वेचे जाळे नागपूरपर्यंत पोहचविले.

मध्यवर्ती नागपूर रेल्वेस्थानकाची हेरिटेज इमारत आजही या इतिहासाची साक्ष देत आहे. ब्रिटीश स्थापत्यकलेचा उत्तम नमुना असलेल्या या इमारतीच्या सौदर्यात भर घालण्याच्या हेतूने भारतीय रेल्वेने बुलंद इंजिन रेल्वेस्थानकाच्या दर्शनी भागात प्रदर्शित केले आहे. उंच प्लॅटफार्मवरील बुलंद आजही सर्वसामान्यांच्या मनात रेल्वेची शान आणि मान टिकवून आहे. मात्र, आकाशाखाली असलेल्या या इंजिनच्या नियमित देखभाली अभावी त्यावर धूळ साचली.

पावसाळयात पाणी लागल्याने त्याला जंग चढला. त्यामुळे खर्चबचतीचे उदिष्ठ असतानाही बुलंदच्या रंगरंगोटीची वेळ रेल्वेवर आली. दुरावस्थेमुळे नाईलाजास्तव सजग स्थानिक प्रशासनाला कर्तव्यदक्षता परिचय देत तातडीने रंगरंगोटी करत आहे. येणाºया दिवसात बुलंद कात टाकणार आहे. हा परंपरागत ठेवा जनतेच्या डोळयात साठवणे शक्य होणार आहे.