Published On : Mon, Jun 29th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नसरापूर चिमुकली हत्या प्रकरणाचा निकाल; आरोपी भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा!

Advertisement

पुणे-संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या नसरापूर येथील साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवरील लैंगिक अत्याचार आणि हत्येच्या प्रकरणात विशेष न्यायालयाने सोमवारी ऐतिहासिक निर्णय देत आरोपी भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा सुनावली. न्यायालयाच्या या निकालामुळे पीडित कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला असून राज्यभरातून निर्णयाचे स्वागत होत आहे.

१ मे २०२६ रोजी भोर तालुक्यातील नसरापूर येथे आरोपीने खाऊचे आमिष दाखवून निष्पाप चिमुकलीला सोबत नेले. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार करून गुन्ह्याचे पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने तिची निर्घृण हत्या केली. एवढ्यावरच न थांबता मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्यात लपवून ठेवण्यात आला होता. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात संतापाची तीव्र लाट उसळली होती.

Gold Rate
Sept 29,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 47,300 /-
Gold 22 KT ₹ 1,36,5700 /-
Silver/Kg ₹ 2,22,300/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

तपासादरम्यान पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा माग काढला. फुटेजमध्ये आरोपी चिमुकलीला घेऊन जाताना स्पष्ट दिसत होता. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली होती. विशेष म्हणजे, आरोपीच्या कुटुंबीयांनीही त्याच्याविषयी कोणतीही सहानुभूती न दाखवता कठोर शिक्षेची मागणी केली होती.

विशेष न्यायालयाने यापूर्वी आरोपीला दोषी ठरवले होते. शिक्षेबाबतचा निर्णय राखून ठेवण्यात आला होता. सोमवारी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने हा गुन्हा ‘दुर्मीळातील दुर्मीळ आणि अत्यंत क्रूर स्वरूपाचा’ असल्याचे नमूद करत आरोपीला मृत्युदंडाची शिक्षा सुनावली.

Advertisement

निकालावेळी पीडित चिमुकलीचे आई-वडील न्यायालयात उपस्थित होते. निर्णय जाहीर होताच त्यांच्या डोळ्यांत अश्रू दाटले. आपल्या मुलीला अखेर न्याय मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

या हत्याकांडानंतर राज्यभरात निषेध मोर्चे, आंदोलने आणि आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची जोरदार मागणी करण्यात आली होती. अखेर न्यायालयाच्या निर्णयाने या बहुचर्चित प्रकरणाचा न्यायालयीन निकाल लागला असून, महिला आणि बालकांवरील अत्याचार करणाऱ्यांविरोधात कायदा कठोर भूमिका घेईल, असा स्पष्ट संदेश या निर्णयातून देण्यात आला आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.