Published On : Tue, Jun 23rd, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात खळबळ! नामांकित डॉक्टरांचा रुग्णालयातील केबिनमध्ये संशयास्पद मृत्यू

- केबिनमध्ये आढळली इंजेक्शन्स; पोलिसांकडून मृत्यूचे कारण शोधण्याचे प्रयत्न सुरू
Advertisement

नागपूर : शहरातील प्रसिद्ध न्यूरॉन रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. ईश्वरचंद्र चांदेवार यांचा त्यांच्या केबिनमध्ये संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त होत असून शहरातही मोठी खळबळ उडाली आहे. धंतोली पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

माहितीनुसार, डॉ. चांदेवार हे नियमितप्रमाणे रुग्णालयात दाखल झाले होते. दिवसभराची वैद्यकीय कामे पूर्ण केल्यानंतर ते विश्रांतीसाठी आपल्या केबिनमध्ये गेले. मात्र बराच वेळ उलटल्यानंतरही ते बाहेर न आल्याने सहकाऱ्यांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. वारंवार दरवाजा ठोठावूनही प्रतिसाद न मिळाल्याने संशय निर्माण झाला.

Gold Rate
Aug 26 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 62,400 /-
Gold 22 KT ₹ 1,50,700 /-
Silver/Kg ₹ 2,45,800/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

घटनेची माहिती मिळताच धंतोली पोलिसांनी रुग्णालय गाठले. दरवाजा उघडल्यानंतर डॉ. चांदेवार हे केबिनमध्ये बेशुद्धावस्थेत आढळून आले. तत्काळ तपासणी करण्यात आली असता त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.

दरम्यान, घटनास्थळी काही इंजेक्शन्सही आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मृत्यूमागील नेमके कारण काय, याबाबत विविध शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. मात्र पोलिसांनी अद्याप कोणत्याही निष्कर्षापर्यंत न पोहोचता सर्व बाबींचा तपास सुरू असल्याचे सांगितले आहे.

Advertisement

सध्या शवविच्छेदन अहवाल आणि इतर वैद्यकीय तपासणीनंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असून, पोलिसांकडून पुढील चौकशी सुरू आहे.

Advertisement
Nagpur Crime: मानकापुर में ₹6.64 लाख की चोरी का खुलासा! #NagpurNews #MankapurNews #Crime #CCTVCrime

Nagpur Crime: मानकापुर में ₹6.64 लाख की चोरी का खुलासा! #NagpurNews #MankapurNews...

Nagpur: 11 साल की बच्ची से Instagram पर अश्लील चैट का आरोप #NagpurNews #POCSOCase #InstagramCrime

Nagpur: 11 साल की बच्ची से Instagram पर अश्लील चैट का आरोप...

नागपुर के अंबाझरी तालाब में कूदी 16 साल की किशोरी #NagpurNews #AmbazhariLake #Crime #newsupdate

नागपुर के अंबाझरी तालाब में कूदी 16 साल की किशोरी #NagpurNews #AmbazhariLake...

नागपुर में किराना दुकान लूट का खुलासा! चाकू की नोक पर लूट #NagpurNews  #Crime #CCTVFootage #news

नागपुर में किराना दुकान लूट का खुलासा! चाकू की नोक पर लूट...

अमरावती में नवजात मौतों पर विजय वडेट्टीवार का सरकार पर हमला!   #MaharashtraNews #Newborn #Politics

अमरावती में नवजात मौतों पर विजय वडेट्टीवार का सरकार पर हमला! #MaharashtraNews...

जालना में भांजी को अपशब्द कहने पर युवक की हत्या! #Crime #MaharashtraNews #MurderCase #CrimeNews

जालना में भांजी को अपशब्द कहने पर युवक की हत्या! #Crime #MaharashtraNews...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges