Published On : Thu, Jun 18th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात वाहनचोर टोळीचा पर्दाफाश; तीन आरोपी जेरबंद!

क्राइम ब्रँचची कारवाई; दीड लाखांचा मुद्देमाल हस्तगत, तिघांचा शोध सुरू
Advertisement

नागपूर : नागपूर शहर गुन्हे शाखेच्या वाहन चोरीविरोधी पथकाने कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चारचाकी वाहन चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावत तीन आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून चोरीची मारुती सुझुकी ओम्नी कार तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली असून सुमारे दीड लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

कोराडी पोलीस ठाण्यात दाखल वाहन चोरीच्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना वाहन चोरीविरोधी पथकाने तांत्रिक माहिती आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा माग काढला. सीसीटीव्हीमध्ये सहा जण वाहन चोरी करताना दिसून आले होते. त्यानुसार पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत तीन आरोपींना अटक केली.

Gold Rate
Aug 3 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 43,400 /-
Gold 22 KT ₹ 1,33,100 /-
Silver/Kg ₹ 2,20,400/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अब्दुल रब ऊर्फ मस्तान नियाज अन्सारी, राहील कलाम शेख आणि आबिद अहमद ऊर्फ समीर शफीक अहमद यांचा समावेश असून तिघेही यशोधरा नगर परिसरातील रहिवासी आहेत.

चौकशीदरम्यान आरोपींच्या कबुलीजबाबावरून चोरीची ओम्नी कार आणि गुन्ह्यात वापरलेली पल्सर मोटारसायकल जप्त करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या वाहनांची एकूण किंमत सुमारे १.५० लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Advertisement

दरम्यान, या प्रकरणातील फैजान, जसीन ऊर्फ बौवा आणि एका अल्पवयीन आरोपीसह आणखी तीन जण फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. या कारवाईत सायबर युनिट आणि गुन्हे शाखेच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली. अटक आरोपींना आणि जप्त मुद्देमालाला पुढील कारवाईसाठी कोराडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Advertisement
सहस्रकुंड जलप्रपात उफान पर, पर्यटकों की भारी भीड़ #maharashtranews #nanded #newsupdate #maharashtra

सहस्रकुंड जलप्रपात उफान पर, पर्यटकों की भारी भीड़ #maharashtranews #nanded #newsupdate #maharashtra

"रेशीमबाग से निकले, पातालयंत्री स्वभाव के"

"रेशीमबाग से निकले, पातालयंत्री स्वभाव के"

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

निर्मल उज्ज्वल के प्रमोटर के घर पहुंचे जमाकर्ता | "हमारा पैसा वापस करो" | Nagpur News | Viral Video

निर्मल उज्ज्वल के प्रमोटर के घर पहुंचे जमाकर्ता | "हमारा पैसा वापस...

NagpurCrime : नागपुर में काली बाइक गैंग का आतंक; एक दिन में 3 जगह वारदात #Nagpur #NagpurNews #Crime

NagpurCrime : नागपुर में काली बाइक गैंग का आतंक; एक दिन में...

Amravati: दर्यापुर के ज्वेलर्स में हथियारबंद डकैती #Amravati #jewellery  #Robbery #Crime #Robbery

Amravati: दर्यापुर के ज्वेलर्स में हथियारबंद डकैती #Amravati #jewellery #Robbery #Crime #Robbery

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges