Published On : Thu, Sep 12th, 2019

वासुदेव जिवतोडे जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

पारशिवनी:–पाराशिवनी पंचायत सामिती शिक्षण वििभाग तफै जिल्हा परिषद केदियं शाळा पाराशिवनी येथिल शिक्षक वासुदेव जिवतोडे याच्या जिल्हा परिषद नागपूरच्या वतीने दिला जाणारा अत्यंत मानाचा “जिल्हा आदर्श शिक्षक” पुरस्कार जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा पारशिवनी येथील सहाय्यक शिक्षक वासुदेव धनराज जिवतोडे यांना जि.प.नागपूचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक संजय यादव यांचे व चिंतामण वंजारी प्राथमिक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी डाँ.शिवलिंग पटवे माध्यमिक शिक्षणाधिकारी यांचे प्रमुख उपस्थितीत दि. ५ सप्टेंबर २०१९ ला जि.प.कन्या विद्यालय काटोल रोड नागपूर येथे सन्मानपूर्वक सन्मानपत्र , सन्मानचिन्ह , शाल, श्रीफळ देवून प्रदान करण्यात आला.

याप्रसंगी पारशिवनीचे गटशिक्षणाधिकारी विलास काटोले,मनोहर बावस्कर,दिनेश धवड, सुभाष जाधव,कैलास लोखंडे आदी उपस्थित होते.वासुदेव धनराज जिवतोडे यांची सेवेची सुरवात २१ आँक्टोंबर १९९५ दुर्गम भागातील जि.प.प्राथमिक शाळा उमरी(पाली) येथून झाली. तेथे त्यांनी १५ वर्षाच्या सेवाकाळात शाळेत अभ्यास पूरक उपक्रमासोबतच अभ्यासेत्तर उपक्रम राबविले.शाळा विकासासाठी व विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी ते नेहमी प्रयत्नशिल राहीले. येथे त्यांनी शाळेला एकप्रकारे संजीवनी देण्याचेच कार्य केले.

त्यानंतर जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा पारशिवनी ४ जून२०११ ला रुजू होऊन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी विशेष प्रयत्न केले. लोकसहभागातून शाळा व १० वर्ग डिजीटल , लोकसहभागातून गरीब विद्यार्थ्यांना गणवेश,बेल्ट,शाँक्स,शुज मिळवून देणे, क्रांतिकारकांच्या बलीदानाचा इतिहास गाऊ त्यांना आरती कार्यक्रम राबविले,थोर महा पुरुषांचे चरित्रवाचन , स्वच्छता हिच सेवा कार्यक्रम,अतुल्य भारत सामान्यज्ञान स्पर्धा,जागर संविधानाचा सामान्यज्ञान स्पर्धा,राजा शिवछत्रपती सामान्यज्ञान स्पर्धा, शिष्यवृत्तीचे अतिरिक्त वर्ग,शाळा सफेदी व रंगरंगोटी,लोकसहभागातून शाळेचा सर्वांगिण विकास,वृक्ष लागवड,बिजगोळे लागवड, वृक्षसंवर्धन,वृक्षरक्षाबंधन,स्नेहसंमेलनाचे उत्तम आयोजन,बालआनंद मेळाव्याचे आयोजन, कुटूंब कल्याण कार्यक्रम,हागणदारी मूक्त गाव,व्याख्यान व सामाजिक प्रबोधन,ज्ञानरचनावाद, तंबाखू मूक्त शाळा , स्वच्छता अभियान,बाल क्रीडा महोत्सवात उत्कृष्ट सहभाग ,कृती संशोधन,अध्ययन स्तर निश्चिती कार्यक्रमात उत्कृष्ट सहभाग,वाचन प्रेरणा दिन, राष्ट्रीय एकता दिन,युवक दिन,मराठी राजभाषा दिन,झाडांच्या वर पक्षांसाठी पाणपोई,शालेय मंत्रिमंडळ स्थापना, नियमित पालकसभेचे आयोजन करुन १००% पटसंख्या व गुणवत्ता वाढविणे, गरीब विद्यार्थ्यांसाठी किलबिल प्ले स्कूल चालविणे,शाळेत संविधान व बालोद्यान निर्मितीत सहकार्य,अंधश्रध्दानिर्मूल साठी सामाजिक प्रबोधन,प्राणायम व योग शिबिरात सहभाग, रक्तदान, स्वच्छ भारत अभियानात सहभाग, जनगणना, मतदार याद्या, निवडणूक कार्यक्रमात उत्कृष्ट सहभाग इत्यादी कार्य केले.

त्यांच्या अशा या शैक्षणिक, सामाजिक,सांस्कृतिक,साहित्यिक,श्रेत्रातील प्रशंसनिय जनसेवेच्या गौरवार्थ सन्मानपत्र व पुरस्कार प्रदान करण्यात आला.या प्रसंगी मुख्याध्यापक धनराज कळसाईत,खुशाल कापसे,भारती धुंडे,मोनाली पडगीलवार,आशा तेलंग,सरीता चोबितकर,गिता वंजारी,रेणुका बोंद्रे,संगिता चरडे,सारीका जनबंधू तृप्ती कळँबे,विजय भरणे, चैताली जिवतोडे हे शिक्षक हजर होते.त्यांच्या या पुरस्काराबद्दल व कार्याबद्दल पाराशिवनी चे गटविकास अधिकारी प्रदीप बमनोटे,गटशिक्षणाधिकारी विलास काटोले,शिक्षण.विस्तार.आधिकारी.कैलाशलोखंडे,योगेश ठाकरे,शाळा व्य.समितीचे सर्व पदाधिकारी व पालकांनी त्यांचे कौतुक व अभिनंदन केले.

तालुका प्रातिनि्धी कमल यादव पाराशिवनी