Published On : Thu, Jul 30th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात 33 व्या डॉ. वसंतराव देशपांडे स्मृती संगीत सोहळ्याचा दिमाखदार प्रारंभ; शुभा मुदगल यांच्या सादरीकरणाने रंगली मैफल

Advertisement


नागपूर -दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूर (संस्कृती मंत्रालय, भारत सरकार) यांच्या वतीने आयोजित 33 वा डॉ. वसंतराव देशपांडे स्मृती संगीत सोहळा बुधवारी (29 जुलै) सायंकाळी दिमाखदार वातावरणात सुरू झाला. शास्त्रीय संगीताच्या सुरांनी आणि सितारच्या मधुर निनादाने रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.

सोहळ्याचे उद्घाटन नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील, सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर, ज्येष्ठ गायिका पद्मश्री शुभा मुदगल तसेच दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या संचालिका आस्था कार्लेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी उपसंचालिका मिथिला तळवणेकर आणि सहाय्यक संचालक (कार्यक्रम) दीपक कुलकर्णी उपस्थित होते. मान्यवरांचा शाल, स्मृतिचिन्ह आणि रोप देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात पद्मश्री शुभा मुदगल यांच्या शास्त्रीय गायनाने झाली. त्यांनी राग मधुवंतीमधील “बरखा में कोऊ मान करत है” या बंदिशीने मैफलीची सुरुवात केली. त्यानंतर “सैंया बिन लागत बूँद कटारी” हा दादरा आणि “झूलें आज ललित हिंडोरे सखियाँ” या झुल्याच्या सादरीकरणाने त्यांनी रसिकांची दाद मिळवली. त्यांना तबल्यावर अनीश प्रधान, संवादिनीवर सुधीर नायक, तर तानपुर्यावर सुरभी उबाडे आणि श्रेया सालोडकर यांनी साथसंगत केली.

Gold Rate
Sept 12,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 53,400 /-
Gold 22 KT ₹ 1,42,300 /-
Silver/Kg ₹ 2,31,200/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

सोहळ्याच्या दुसऱ्या सत्रात प्रख्यात सितारवादक निलाद्री कुमार यांनी आपल्या सुरेल सितारवादनाने वातावरण भारावून टाकले. त्यांनी राग जयजयवंतीने सादरीकरणाची सुरुवात केली आणि राग भैरवीने कार्यक्रमाचा समारोप केला. त्यांना तबल्यावर सत्यजित तळवलकर यांनी उत्कृष्ट साथ दिली.

पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमाला नागपूरसह परिसरातील मोठ्या संख्येने संगीतप्रेमी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता शेलगांवकर यांनी केले.

Advertisement

आज ‘देवबाभळी’ संगीत नाटकाची मेजवानी-
गुरुवार, 30 जुलै रोजी मुंबईच्या भद्रकाली प्रॉडक्शन्सतर्फे गाजलेले मराठी संगीत नाटक ‘देवबाभळी’ सादर करण्यात येणार आहे. प्राजक्त देशमुख लिखित व दिग्दर्शित या नाटकाला आनंद ओक यांचे संगीत लाभले आहे. 800 हून अधिक प्रयोग पूर्ण केलेल्या या नाटकाला आतापर्यंत 44 पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

समारोपाच्या दिवशी रोनू मजूमदार आणि डॉ. भरत बलवल्ली यांची मैफल-
शुक्रवार, 31 जुलै रोजी सोहळ्याच्या अखेरच्या दिवशी पद्मश्री पं. रोनू मजूमदार यांचे बासरीवादन होणार असून, त्यांनी भारतीय बासरीला जागतिक स्तरावर विशेष ओळख मिळवून दिली आहे. त्यानंतर प्रतिष्ठित गायक आणि संगीतकार ‘स्वराधीश’ डॉ. भरत बलवल्ली यांचे शास्त्रीय गायन सादर होईल. दीनानाथ मंगेशकर यांच्या गायकीचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यात त्यांचे मोठे योगदान असून, त्यांना अनेक राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.