Published On : Tue, Jun 9th, 2020

स्टेट बँक रामटेक येथे कोरोणापासून बचावासाठी विविध उपाययोजना

रामटेक – कोरोणाने संपूर्ण देशात धुमाकूळ घातला आहे. देश आता कोरोनाच्या संख्येत जगात पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे. परिस्थिती एवढी गंभीर झाली आहे, की काही लोकांवर उपासमारीची परिस्थिती आली आहे. सोषल डिस्टन्ससिंग ठेवणे , मास्क लावणे , स्वतःला सुरक्षित ठेवणे आता गरजेचे बनले आहे.

स्टेट बँक रामटेक येथे कोरोनापासून बाचावा साठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. बँकेतील सर्व कर्मचारी , अधिकारी चपराशी, चौकीदार हे सर्वजण फेस शिल्ड मास्क लावून ह्यांड ग्लोवज घालून ,

सोशल डिस्टन्सिंग ने काम करत आहेत. बँकेत येणाऱ्या ग्राहकांनाही सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत जागरूक राहून मास्क घालावे व हात हात साफ धुवावे असे सांगितले जात असल्याचे उपशाखा प्रबंधक महेंद्र पाटील यानि सांगितले. बँकेतील येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला हाथ पाय धुवूनच एका एकाला प्रवेश असते. सुरक्षा रक्षक यांचे मदतीने ग्राहक आपले हात स्वच्छ धुवून , तोंडाला मास्क लावून बँक मधे प्रवेश दिला जात असल्याचे तसेच ग्राहक बँक समोर एका मागे एक अंतर ठेवून उभे असतात आणि फक्त एकाच ग्राहकाला आत मध्ये जाण्याची एंट्री असते. आत मधे गेल्यावर प्रत्येक ग्राहकाची स्क्रिनिंग मशीन द्वारे मशीन तपासणी होत असल्याचे चित्र नीदर्शनास आले .

एकदम गर्दी होनार नाही याची बैंक येथील कोरोना योद्धा सर्वोतो परी दक्षता घ्यायला लावतात .सर्व ग्राहक सूचनांचे पालन करतात. . स्टेट बॅंक चे शाखा प्रबंधक मोहनसिंग भाटी , उपशाखा प्रबंधक महेंद्र पाटील, फिल्ड ऑफिसर राध्येशाम मुंगमुले , प्रोफेशनरी ऑफिसर ममता सोरते, कैशियर संगीता नागोसे, किशोर सोणकुसरे व बँकेतील कर्मचारी व सुरक्षा रक्षक यांनी ग्राहकांना “स्वतःची काळजी घेने, सोशल डीस्टसिंग चे पालन करणे आणि मास्क लावून स्वच्छ हात पाय धुवून च बँक मधे येणे या करीता त्याँच्या मधे जनजागृत्ती करुन त्याँना बैंक मधे प्रवेश देत आहेत।

स्टेट बॅंक चे शाखा प्रबंधक मोहनसिंग भाटी याना विचारना केली असता “आलेल्या संकटाला मात करण्यासाठी संपूर्ण स्टेट बँक चा स्टाफ सुरक्षेच्या दृष्टीने प्रयत्न करत असल्याचे मत व्यक्त केले .