Published On : Tue, Jun 9th, 2020

रानडुक्कराची शिकार करून मांसाची विक्री करण्याच्या प्रयत्नात सापडले सर्व आरोपी

Advertisement

रामटेक – आसोली बीटा अंतर्गत रानडुक्कराची शिकार झाली असून त्याच्या मांसाची विक्री होत असल्याची गुप्त माहिती सात जूनला वनविभागाला प्राप्त झाली .त्याआधारे रामटेक सहाय्यक वनरक्षक संदीप गिरी,वनपरिक्षेत्र अधिकारी आर डी शेंडे,यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्र सहाय्यक डी आर अगडे, वनरक्षक स्वरूप गेरवार,पी जी कारामोरे,व्ही वाय उगले यांनी सापळा रचून भांडेवाडी ते शिवादौली या रस्त्यावर रानडुक्कराचे मास आरोपी सुनील रतीराम गोणे रा.अरोली यांना मोटारसायकल बजाज डीसकव्हर क्रमांक एम एच 40 व्ही 5304 ने जात असताना आढळला .

त्याच्यावर संशय आल्याने त्याला थांबवून त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळील दोन पिशव्यांमध्ये अंदाजे 30 किलो रानडुक्कराचे मास मिळाले.त्याला चौकशी करिता ताब्यात घेतल्यावर त्याने रानडुक्कराचे मास भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील हिवरा गावातील सुभाष भाऊराव महालगावे यांच्याकडून दोन हजार रुपयाला विकत घेऊन अरोलीत विक्रीसाठी आणले अशी कबुली चौकशी दरम्यान दिली.लगेच सुभाष महालगावे याला ताब्यात घेतल्यावर त्याने शिकारी गावठी कुत्र्यांच्या सहाय्याने अडेगाव शिवारात केल्याची कबुली दिली.

सुशील मूलचंद महालगावे(27वर्ष),मोरेश्वर गणपत मेश्राम(50),बळीराम शिवा भोयर(30),रोशन सतीराम चौधरी(20 वर्ष) रा हिवरा ता मोहाडी यांनी रानडुक्कराची शिकार केल्यावर त्याचे मांस लोखंडी कुऱ्हाड व सुरीने कापून त्याचे तुकडे करण्यात आले अशी कबुली दिल्यावर सर्वांना ताब्यात घेऊन आरोपींच्या घरून कुऱ्हाड व सूरी जप्त करण्यात आली. सदर आरोपींना वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 चे कलम 9,39,48(अ)50 व 51(1),जैवविविधता अधिनियम 2002 चे कलम 56 अनवय वनगुन्हा क्र 97/15 दिनांक 07/06/2020अनवये वनगुन्हा दाखल करून 8 जूनला अटक करण्यात आली.

दिनांक ९ जूनला कोर्ट मधे पेशी केले असता जमानत झाली असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी आर डी शेंडे यांनी सांगितले.