Nagpur City No 1 eNewspaper : Nagpur Today

| | Contact: 8407908145 |
Published On : Mon, Apr 16th, 2018

उत्पादन शुल्क विभागाचे विविध परवाने ऑनलाईनच दिले जावेत : बावनकुळे

Maharashtra Energy Minister Chandrashekhar Bawankule
मुंबई/नागपूर: उत्पादन शुल्क विभागातर्फे देण्यात येणारे परवाने हे यापुढे ऑनलाईनच देण्यात यावे असे निर्देश उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिले.

द डिस्टिलर्स असो.ऑफ महाराष्ट्र या संघटनेसोबत झालेल्या बैठकीत हे निर्देश देण्यात आले. ही बैठक मुंबईत झाली. या विभागात अधिक सुसूत्रता आणण्यासाठी इझी ऑफ डुइंग बिझनेस या सूत्राचा अवलंब केला जाणार आहे. यापुढे मद्य पॅकबंद बाटलीतच मिळावे, अशी मागणी या संघटनेकडून समोर आली. सार्वजनिक जागेत मद्य प्राशन करणार्‍यांवर नियंत्रण आणण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. सीएल-3 देशी दारूच्या दुकानात यापूर्वी खुली दारू उपलब्ध होत होती. त्यामुळे खुलेआम दारूचे सेवन केले जाते. खुल्या दारूमुळे सर्वसामान्य जनतेला होणारा त्रास रोखण्यासाठ़ी सीएल-3 परवानाधारक दुकानात व पॅकबंद बाटलीत विकण्यात यावी. सीएल-3 व एफएल-2 ही दुकाने सकाळी 8 ते रात्री 10 पर्यंतच सुरु राहतील असे निर्देशही यावेळी देण्यात आले.

देशी दारूच्या रंगाबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात आली. सध्या देशी दारू पांढर्‍या रंगात उपलब्ध आहे. असोसिएशनच्या म्हणण्यानुसार विदेशी दारूप्रमाणेच देशी दारूलाही रंग असावा. देशी दारूला रंग असला तर अवैध दारूवर नियंत्रण मिळविता येईल, असे मत व्यक्त करण्यात आले.

याप्रसंगी असोसिएशनला उत्पादन शुल्क मंत्र्यांनी ग्रामरक्षक दल गठित करणे व त्यास सहकार्य करण्याची सूचना केली. अवैध दारू विक्री रोखण्यासाठी ग्रामरक्षक दल हा प्रभावी उपाय असून अवैध दारू निर्मिती कुठे होते याचा शोध घेऊन या व्यवसायाला आळा घालण्यासाठी सरपंचाच्या मदतीने ग्रामरक्षक दलास सहकार्य करण्याची सूचनाही बावनकुळे यांनी केली.

Trending In Nagpur
Stay Updated : Download Our App
Mo. 8407908145