Published On : Mon, Aug 19th, 2019

एकापाठोपाठ येणाऱ्या विविध सणोत्सवातून घडणार तालुक्यात सामाजिक एकोप्याचे दर्शन

पी आय बाकल ने घेतली गावप्रतिष्ठित नागरिकांची सभा

कामठी :-दरवर्षी ऑगस्ट अनं श्रावण महिना उजळताच विविध सणोत्सवाची मांदियाळी सुरू होते .नुकतेच बकरी ईद, रक्षाबंधन , 15 ऑगस्ट , पारशी नववर्ष पतेती आदी सणोत्सव नुकतेच उत्साहात पार पडले याचबरोबर आगामी काळात दहीहंडी, गोकुळ अष्टमी, पोळा ऋषीपंचमी आणो हरतालिका , गणेशोत्सव, मोहरम, उरूस आदी सणउत्सव यामहिन्या भरात होणात आहे. हे सर्व सणोत्सव कामठी शहरात गुण्यागोविंदाने विविध धर्मीय नागरिक साजरे करीत असतात यानुसार या विविध सणोत्सवामुळे कामठी तालुक्यात सामाजिक एकोप्याचे दर्शन घडून येत आहे.यानुसार हा सामाजिक एकोपा कायम असावा या मुख्य उद्देशाने डीसीपी निलोत्पल व एसीपी राजेश परदेसी यांच्या मार्गदर्शनार्थ नवीन कामठी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष बाकल शहरातील विविध प्रभागातील प्रतिष्ठित नागरिकांचो विशेष बैठक घेऊन मार्गदर्शन करीत आहेत.

मागील अनेक वर्षानंतर प्रथमच यंदा श्रावण महिन्यात विविध धार्मिक सणोत्सवाची रेलचेल असल्याने कामठी तालुक्यात सामाजिक एकोप्याचे दर्शन घडू लागले आहे .या सणांची पर्वणीच असल्याने या नामी संधिचा लाभ विविध राजकोय पक्षमार्फत घेतला जात आहे तर या सणोत्सवामुळे कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने तालुका प्रशासनासह पोलीस दलावर देखील बंदोबस्ताचा ताण वाढत असतानाही कर्तव्य बजावून सणोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न होत आहेत.

बकरी ईद, रक्षाबंधन, भारतीय स्वातंत्र्य दिन, पारशी नववर्ष दिन पतेती आदी सणोत्सव नुकतेच उत्साहात पार पडले याचबरोबर आगामी दहीहंडी, गोकुळ अष्टमी, पोळा , ऋषीपंचमी आणि हरतालिका, गणेशोत्सव, मोहरम उरूस आदी सणोत्सवाच्या पाश्वरभूमीवर कामठी तालुका पोलीस दलातर्फे शहरात कायदा व सुव्यवस्था नोयंत्रणात राहत शांतता अबाधीत राहावी यासाठी पोलीस विभाग आतापासूनच सतर्क झाला आहे.

समाज माध्यमांद्वारे धार्मिक भावना दुखावणाऱ्या व्यक्तीवर पोलिसांचो करडी नजर राहणार असून यासाठी नवीन कामठी पोलीस स्टेशन येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष बाकल व जुनी कामठी पोलीस स्टेशन येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नगराळे यांच्या मुख्य उपस्थितीत प्रत्येक समाजातील प्रतिष्ठाच्या बैठका घेऊन सणोत्सवा बाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे.

संदीप कांबळे कामठी