Published On : Mon, Aug 19th, 2019

स्वच्छतेसाठी मनपाद्वारे सर्वोत्कृष्ट झोन स्पर्धा

आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांची माहिती

नागपूर : नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे ही मनपाची जबाबदारी असून यासाठी स्वच्छतेकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. स्वच्छ सर्वेक्षण २०१९ मध्ये आपल्या नागपूर शहराचा दर्जा सुधारावा तसेच स्वच्छतेच्या बाबतीत नागरिकांमध्ये जनजागृती यावी यासाठी प्रयत्न करणेही आवश्यक आहे. शहरातील दहाही झोनमध्ये स्वच्छतेची विशेष काळजी घेतली जावी यासाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे आता सर्वोत्कृष्ट स्वच्छ झोन स्पर्धा घेण्यात येणार आहे. स्वच्छतेच्या बाबतीत सर्वोत्कृष्ट ठरणा-या झोनला २६ जानेवारीला महापौरांच्या हस्ते १० हजार रुपये रोख पुरस्कार देउन गौरविण्यात येईल, अशी माहिती वैद्यकीय सेवा व आरोग्य विशेष समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी दिली.

विविध विषयांच्या अनुषंगाने सोमवारी (ता.१९) मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये वैद्यकीय सेवा व आरोग्य विशेष समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत वैद्यकीय सेवा व आरोग्य विशेष समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांच्यासह समितीचे उपसभापती नागेश सहारे, सदस्या लीला हाथीबेड, विशाखा बांते, सरीता कावरे, नगरसेवक जितेंद्र घोडेस्वार, नगरसेविका ममता सहारे, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, प्रभारी आरोग्य उपसंचालक डॉ. भावना सोनकुसळे, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. सुनील कांबळे, आरोग्य अधिकारी (दवाखाने) डॉ. सरीता कामदार, हत्तीरोग अधिकारी जयश्री थोटे, पशुचिकित्सक अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, सहायक आयुक्त प्रकाश वराडे, सहायक आयुक्त गणेश राठोड यांच्यासह दहाही झोनचे झोनल अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत ऐवजदार सफाई कर्मचा-यांना पदावर स्थायी करण्याबाबत नगरसेवक जितेंद्र घोडेस्वार यांचे नोटीस तसेच प्रभाग क्रमांक ९ अंतर्गत कामठी रोड वरील पाटणी ऑटोमोबाईलजवळ भारत सिनेमा परिसरात स्क्रोल विनीयम प्रा.लि.तर्फे डायरेक्ट लक्ष्मण मनोहर सावंत द्वारा रॉय उद्योग लि. यांनी सुरू केलेल्या सीताबर्डी येथील प्रस्तावित बांधकामामुळे ७० वर्षे जुनी ट्रंक लाईन डॅमेज झाल्याने त्याची जबाबदारी निश्चीत करण्याच्या विचारार्थ व निर्णयास्तव नगरसेविका ममता सहारे यांच्या नोटीसवर चर्चा करण्यात आली. दोन्ही विषय सभागृहात पाठविण्याची नगरसेवक जितेंद्र घोडेस्वार व नगरसेविका ममता सहारे यांची मागणी मान्य करीत आरोग्य समिती सभापतींनी त्यासंबंधी यावेळी निर्देश दिले.

याशिवाय किटकजन्य आजार तसेच डेंग्यू वर उपाययोजना करण्याबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली. शहरात मागील महिन्यामध्ये डेंग्यूचे काही रुग्ण आढळले आहेत. झोनस्तरावर फवारणी करण्यासाठी १३५ कर्मचारी नियुक्त करण्यात आले असल्याची माहिती विभागाच्या वतीने देण्यात आली. डेंग्यूचा लारवा पाण्यामध्ये वाढत असल्याने शहरातील मोकळ्या जागा, भूखंड लक्षात घेउन याठिकाणी नियमीत औषध फवारणी करणे तसेच डेंग्यूचे रुग्ण वाढू नयेत यासाठी शहरात आणखी काय उपाययोजना करता येतील, याचीही माहिती समितीपुढे सादर करण्याचे निर्देश यावेळी आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी दिले.

गणपती विसर्जनासाठी अधिक काळ टिकाणा-याच कृत्रिम टँक तयार करा
गणेशोत्सवात नागपूर महानगरपालिकेद्वारे नागरिकांना सुविधा देण्यासाठी मनपा प्रशासन सज्ज झाले आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा यासाठी यावर्षी फुटाळा तलावात मोठ्या गणेश मूर्ती वगळत अन्य कोणत्याही तलावात गणेश मूर्ती विसर्जनास बंदी करण्यात आली असून सर्व तलाव सिल करण्याबाबतची कार्यवाही तातडीने सुरू करा. तसेच गणेश मूर्ती विसर्जनासाठी प्रत्येक झोनस्तरावर कृत्रिम टँक उपलब्ध करण्यात येतात. दरवर्षी या टँक खरेदी करण्यात येतात मात्र पुढील वर्षी त्या पुन्हा खरेदी कराव्या लागतात. कृत्रिम टँकच्या खरेदीचा दरवर्षी मनपावर बसणारा खर्च कमी करण्यासाठी यावर्षी प्रत्येक झोनस्तरावर किमान पाच वर्षे चालतील अशाच कृत्रिम टँक तयार करणे अथवा खरेदी करण्याचे स्पष्ट निर्देश आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी दिले. याशिवाय गणेश विसर्जनाच्या परिसरात निर्माल्य कलशांचीही विशेष व्यवस्था घेणे तसेच परिसरात स्वच्छता राखली जावी, पार्कींगची व्यवस्था, विद्युत व्यवस्था याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. शहरातील विविध गणेशोत्सव मंडळामार्फत पूजा, महाप्रसाद आदी कार्यक्रम घेतले जातात. यामधून निघणारा कचरा इतरत्र न टाकता तो कचरा तो जमा करुन ठेवावे व मनपाच्या स्वच्छता गाड्यांमध्येच तो कचरा देण्यात यावा याबाबत सर्व गणेश मंडळांना पत्र देणे. गणेशोत्सवादरम्यान स्वच्छता, पर्यावरणाचे संवर्धन, पर्यावरणपूरक गणेशोत्सव यासह अन्य सामाजिक बाबतीत जनजागृती व्हावी यासाठी विविध ठिकाणी बॅनर व होर्डींग लावून सामाजिक संदेश देण्याचेही निर्देश आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी दिले.

दहन घाटावरील व्यवस्थेकडे विशेष लक्ष द्या
शहरात हिंदु दहन घाटांसह, मुस्लीम, ख्रिश्चन कब्रस्थान आहेत. याठिकाणी मनपातर्फे सुविधा देण्याचे काम केले