| | Contact: 8407908145 |
  Published On : Sun, Apr 29th, 2018

  मनपातर्फे विविध कामांचे लोकार्पण रविवारी

  ESR, Water Tank

  नागपूर: नागपूर महानगरपालिकेतर्फे आयोजित विविध कामांचे लोकार्पण आज रविवार (ता.२९) रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नतीन गडकरी यांच्या हस्ते होत आहे.

  सकाळी १० वाजता नागपूर महानगरपालिकेच्या सतरंजीपुरा झोनच्या नवनिर्मित इमारतीचे लोकार्पण आयोजित करण्यात आले आहे. संध्याकाळी ५.३० वाजता धरमपेठ झोनअंतर्गत रामनगर येथे गठई कामगारांच्या स्टॉल्सच्या उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. संध्याकाळी ६.३० वाजता चंद्र नगर येथील जलकुंभाचे लोकार्पण आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून राज्याचे उर्जा मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि अध्यक्ष म्हणून महापौर नंदा जिचकार प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे.

  याप्रसंगी आमदार कृष्णा खोपडे, सुधाकर देशमुख, विकास कुंभारे, मिलिंद माने, सुधाकर कोहळे, विधानपरिषदेचे आमदार गिरिश व्यास, प्रा.अनिल सोले, नागो गाणार, प्रकाश गजभिये, उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती विरेंद्र कुकरेजा, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे उपस्थित राहणार आहेत.

  या सर्व कार्यक्रमांना नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन महापौर नंदा जिचकार व आयुक्त अश्विन मुदगल यांनी केले आहे.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145