Published On : Sat, Jan 25th, 2020

केंद्र शासनाच्या विविध योजना कार्यकर्त्यांनी सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवाव्या : बावनकुळे

Advertisement

कामठीत भाजपाचा कार्यकर्ता मेळावा

नागपूर: विकास कामांना रोख लावणार्‍या सरकारला धडा शिकविण्यासाठी कार्यकर्त्यांनी केंद्र शासनाच्या विविध योजना सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवून पक्ष संघटन अधिक मजबूत करावे, असे आवाहन माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

Advertisement
Advertisement

भजापाच्या वतीने गंज बालाजी मंदिरात आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन करताना चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते. यावेळी शहर भाजप अध्यक्षपदी वरिष्ठ कार्यकर्ता नगरसेवक संजय कनोजिया यांची एकमताने निवड करण्यात आली. कार्यक्रमाला भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष संकेत बावनकुळे व संदीप कश्यप उपस्थित होते. भजपा कार्यकर्ता मेळाव्याचे उद्घाटन बावनकुळे यांनी दीप प्रज्वलन करून केले.

आ. टेकचंद सावरकर, महादुला न.प.चे अध्यक्ष राजेश रंगारी, उद्योगपती विजय अग्रवाल, मनोज चवरे, प्रा. मनीष वाजपेयी, अजय कदम, लालसिंग यादव, प्रतीक पडोळे, पिंकी वैद्य, संध्या रायबोले, उज्ज्वल रायबोले, सुषमा शिलाम, सुनील शिलाम, रमेश वैद्य, अशोक झाडे, डॉ. महेश महाजन, श्रीकांत शेंद्रे, डॉ. पंकज वर्मा, राजेश खंडेलवाल, सुभाष मंगतानी, भैयालाल यादव, राजेश देशमुख, पवन रुंगटा उपस्थित होते.

आगामी नप निवडणुकीवर भाजपाचा झेंडा फडकविण्याचे आवाहन बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लाला खंडेलवाल यंनी तर आभार श्रीकांत शेंद्रे यांनी मानले. मोठ्या संख्येने कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement