Published On : Sat, Jan 25th, 2020

महापौरांसह अधिकारी, कर्मचा-यांनी घेतली लोकशाही निष्ठेची शपथ

मनपामध्ये राष्ट्रीय मतदार दिन उत्साहात साजरा

नागपूर : राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त शुक्रवारी (ता.२४) महापौर संदीप जोशी यांनी मनपातील अधिकारी व कर्मचा-यांना लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याची शपथ दिली.

मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहामध्ये शुक्रवारी (ता.२४) राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी महापौर संदीप जोशी यांच्यासह अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपायुक्त राजेश मोहिते, उपायुक्त निर्भय जैन, उपायुक्त डॉ.रंजना लाडे, प्रमुख लेखा तथा वित्त अधिकारी अनंता मडावी, सहायक आयुक्त (साप्रवि) महेश धामेचा, शिक्षणाधिकारी प्रिती मिश्रीकोटकर, कार्यकारी अभियंता मनोज गणवीर, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ.प्रदीप दासरवार, अति.

सहायक आरोग्य अधिकारी डॉ.विजय जोशी, प्रमुख अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, प्रशासकीय अधिकारी रवींद्र पागे, कर निर्धारक व संग्राहक दिनकर उमरेडकर, निगम अधीक्षक मदन सुभेदार, राजु दुबे, बाजार अधीक्षक श्रीकांत वैद्य आदी उपस्थित होते.

२५ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो. मात्र २५ जानेवारी रोजी चवथा शनिवार निमित्त कार्यालयीन सुट्टी असल्यामुळे शासनाचे निर्देशानुसार शुक्रवारी २४ जानेवारी रोजी मनपामध्ये राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला. यावेळी महापौर संदीप जोशी यांनी लोकशाही निष्ठेच्या शपथेचे सामुहिक वाचन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहायक आयुक्त (साप्रवि) महेश धामेचा यांनी आणि संचालन सहायक जनसंपर्क अधिकारी प्रदीप खर्डेनवीस यांनी केले.