| | Contact: 8407908145 |
  Published On : Fri, Jun 29th, 2018

  वराडा बंद टोल नाक्याजवळ विनोद सोमकुंवर ची भरदिवसा हत्या

  कन्हान : – नागपुर जबलपुर राष्ट्रीय महामार्ग क्र ४४ वरील वराडा बंद टोल नाक्याच्या समोर अञात आरोपीने गोंडेगावचे उपसरपंच विनोद सोमकुंवर यांची शिप्ट कार थांबवुन गळ्यावर तलवारीने वार करून भरदिवसा हत्या केली .

  शुक्रवार दि. २९ जुन ला दुपारी ४ ते ४.१५ वाजता दरम्यान गोंडेगाव टेकाडी वरून अण्णा मोड डुमरी आपल्या भावाच्या धाब्यावर गोंडेगाव चे उपसरपंच विनोद यादवराव सोमकुंवर वय ३४ वर्ष हे स्वत: च्या शिप्ट कार क्र. एम एच ४०- ए आर -२८४१ ने जात असताना नागपुर जबलपुर राष्ट्रीय महामार्ग क्र ४४ वरील वराडा (टेकाडी ) बंद टोल नाका व महामार्ग पोलीस केंद्राच्या समोर अञात आरोपीने गोंडेगावचे उपसरपंच विनोद सोमकुंवर यांची शिप्ट कारच्या समोरच्या काचावर तलवारीने वार करून कारला थांबवुन बाहेर काढून कारच्या मागे विनोद च्या गळ्यावर तलवारीने वार करून हत्या केली.

  कन्हान पोलीसांना माहीती मिळताच थानेदार चंद्रकांत काळे आपल्या पोलीस सहका-यासह घटनास्थळी पोहचुन मृतदेह शवविच्छेदनाकरिता कामठी उपजिल्हा ग्रामीण रूग्णालयात रवाना केला . घटनास्थळी रक्ताचा लोट वाहला असुन तलवारीची खाली म्यान पडली होती. तसेच महामार्गाच्या विरूध्द बाजुच्या रस्ता व सर्व्हिस रस्त्याच्या मधिल गवतात बंद मोबाईल व बँटरी फेकलेल्या अवस्थेत पोलीसाना मिळाली.

  विनोद सोमकुंवर हा गोंडेगाव परिसरात कोळश्याच्या अवैध धंद्यात सहभागी असल्याने काही जुन्या वैमनस्यातुन हत्या केल्या असल्याची नागरिकांत चर्चा सुरू होती .

  घटनास्थळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोनिका रा उपविभागीय पोलीस अधिकारी ईश्वर कातकडे, स्थानिय गुन्हे अन्वेषण शाखेचे चंमु , फिंगरप्रिंट अँक्सपट चे पाचारण करण्यात आले असून घटनेचा पुढील तपास सुरू होता. घटनास्थळी महामार्ग पोलीस उशिरा पोहचले होते . बातमी लिहे पर्यंत आरोपी व हत्याचे खरे कारण कळु शकले नव्हते .

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145