| | Contact: 8407908145 |
    Published On : Mon, Dec 7th, 2020

    वंजारी नगर जलकुंभ स्वच्छता ७ डिसेंबर व हनुमान नगर जलकुंभ स्वच्छता ९ डिसेंबर रोजी

    मनपा-OCW ची जलकुंभ स्वच्छता मोहिम …..

    नागपूर: नागपूर महानगरपालिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित पाणी देण्याच्या दृष्टीने सुरु केलेल्या वार्षिक जलकुंभ स्वच्छता मोहिमेंतर्गत वंजारी नगर जलकुंभ (नवीन) ७ डिसेंबर (सोमवार) व हनुमान नगर जलकुंभ ९ डिसेंबर (बुधवार) रोजी स्वच्छ करण्याचे ठरविले आहे.

    सर्व जलकुंभ सकाळी १० ते सायंकाळी ६ दरम्यान स्वच्छ करण्यात येतील. स्वच्छतेच्या या कामांमुळे या जलकुंभावरील पाणीपुरवठा बाधित राहील. या दरम्यान टँकरद्वारे पाणीपुरवठादेखील बंद राहणार असल्याने मनपा-OCWने नागरिकांना पुरेसा पाणीसाठा करून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

    वंजारी नगर जलकुंभ स्वच्छतेमुळे ७ डिसेंबर (सोमवार) रोजी बाधित राहणारे भाग : जुना व नवा बाभूळखेडा, कुकडे लेआऊट, वसंत नगर, वंजारी नगर, जुने व नवे कैलाश नगर, चंद्रमणी नगर, जोशीवाडी, श्रमजीवी नगर, प्रगती नगर, रामेश्वरी रोड, विश्वकर्मा नगर, बजरंग नगर, सावित्रीबाई फुले नगर, म्हाडा क्वार्टर, पोलीस क्वार्टर, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, सोमवारी क्वार्टर, रघुजी नगर, आयुर्वेदिक लेआऊट, आदिवासी कॉलोनी.

    हनुमान नगर जलकुंभ स्वच्छतेमुळे ९ डिसेंबर (बुधवार) रोजी बाधित राहणारे भाग: हनुमान नगर, प्रोफेसर कॉलोनी, चंदन नगर, PTS क्वार्टर, वकीलपेठ, महेश कॉलोनी, सोमवारी क्वार्टर, सिरसपेठ, सराईपेठ, रेशीमबाग.

    NMC-OCW have appealed citizens to co-operate and if they have any complaints regarding water supply or need information please do contact @ NMC-OCW’s Toll Free Number 1800 266 9899 at any time.

    Stay Updated : Download Our App
    Mo. 8407908145