Published On : Tue, Oct 11th, 2022
By Nagpur Today Nagpur News

मनपामध्ये दूरध्वनीवर संवादासाठी आता हॅलो ऐवजी ‘वंदे मातरम्’ मनपाचे परिपत्रक जारी

नागपूर: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून नागपूर महानगरपालिकेच्या मुख्यालयात तसेच सर्व क्षेत्रीय कार्यालयात दूरध्वनीवरील संवादाची सुरूवात ‘हॅलो’ ऐवजी ‘वंदे मातरम्” या अभिवादनाने केली जाईल. यासंबंधी मनपा आयुक्त यांच्या निर्देशानुसार अतिरिक्त आयुक्त श्री. राम जोशी यांनी परिपत्रक जारी केले आहे.

भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे औचित्य साधून शासकीय कार्यालयातील दूरध्वनी किंवा भ्रमणध्वनीवर अभयांगतांशी किंवा सहकारी अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संभाषण करताना ‘हॅलो’ ऐवजी ‘वंदे मातरम’ या अभिवादनाने सुरवात करावी अशा सूचना राज्य शासनाच्या आहेत. या अनुषंगाने अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी नागपूर महानगरपालिकेतील सर्व विभागप्रमुख, झोन क्रमांक १ ते १० या झोनचे सहाय्यक आयुक्त आणि कर्मचाऱ्यांना काही सर्वसाधारण मार्गदर्शन सूचना दिल्या आहेत.

Gold Rate
18 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,00,100 /-
Gold 22 KT ₹ 93,100 /-
Silver/Kg ₹ 1,15,400/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिलेल्या सूचनांनुसार नागपूर महानगरपालिका अंतर्गत सर्व कार्ययलात दूरध्वनी किंवा भ्रमणध्वनीवर अभ्यासगतांशी किंवा सहकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संभाषण करताना हॅलो ऐवजी ‘वंदे मातरम’ या अभिवादनाने सुरुवात करण्यात यावी. तसेच त्यांनी त्यांच्या वैयक्तिक भ्रमणध्वनीवर संवाद साधतांनाही ‘वंदे मातरम’ असे अभिवादन करण्यास सर्व संबंधितांना प्रोत्साहित करावे, कार्यालयात/संस्थेमध्ये येणाऱ्या अभ्यागतांनाही सार्वजनिक जीवनात वंदे मातरम ने अभिवादन करण्याबाबत जाणीव जागृत करावी, विविध विविध बैठकांमध्ये वक्त्यांनी सुरुवात करतांना ती वंदे मातरम या शब्दांनी करावी यासाठी त्यांना प्रोत्साहित करावे, याशिवाय ‘वंदे मातरम’ अभिवादनाचा अधिकाधिक वापर करून अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा असे आवाहन मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी कर्मचाऱ्यांना केले आहे.

Advertisement
Advertisement