Published On : Tue, Oct 11th, 2022
By Nagpur Today Nagpur News

कन्हान नदीत पुन्हा येत आहे फ्लाय ऍश, उत्तर, पूर्व आणि दक्षिण नागपुरच्या पाणीपुरवठ्याला फटका

कन्हान जलशुद्धीकरण केंद्रातुन आंशिक पंपिंग

नागपूर : गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्याने खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्र (KTPS) च्या फ्लाय ऍश तलावातून फ्लाय ऍश स्लरीचा ओव्हरफ्लो पुन्हा एकदा सुरू झाला आहे. यावेळी कन्हान वॉटर ट्रीटमेंट प्लांट (WTP) इनटेक विहिरीजवळ जमा झालेली फ्लाय ऍश स्पष्टपणे दिसली. वारेगाव ओव्हरफ्लो पॉईंटवरून फ्लाय ऍश स्लरीचा ओव्हरफ्लो विसर्जन कोलार नदीत वाहतो आणि शेवटी कन्हान नदीला मिळतो. कन्हान जलशुद्धीकरण केंद्र हे नदीच्या पाण्यात मिसळलेल्या फ्लाय ऍश वर प्रक्रिया करू शकत नाही म्हणून नदीच्या उजव्या काठावर असलेल्या (ड्रायवेल) कच्च्या पाण्याचे पंप बंद करावे लागले म्हणजे 35% पंपिंग पूर्णपणे थांबविण्यात आलेले आहे .

Gold Rate
27 Oct 2025
Gold 24 KT ₹ 1,22,200 /-
Gold 22 KT ₹ 1,13,600 /-
Silver/Kg ₹ 1,51,400/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

कन्हान जलशुद्धीकरण केंद्रातून आता फक्त आंशिक (65%) पंपिंग करण्यात आले ज्यामुळे नागपूर शहराच्या उत्तर, पूर्व आणि दक्षिण भागात असलेले आसी नगर झोन, नेहरू नगर झोन, लकडगंज झोन आणि सतरंजीपुरा झोनमधील 28 जलकुंभ भागात जलसंकट निर्माण झाले आहे . फ्लाय ऍश संदर्भात केटीपीएसच्या संबंधित अधिकाऱ्यांना या घटनेची माहितीदेण्यात आली आहे.

Advertisement
Advertisement