Published On : Tue, Aug 25th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपूरच्या वैशालीनगरात शस्त्रधारी गुंडांचा धुडगूस; दुकानाची तोडफोड करून रोकड लंपास

Advertisement

नागपूरच्या वैशालीनगरात शस्त्रधारी गुंडांचा धुडगूस; दुकानाची तोडफोड करून रोकड लंपास

नागपूर : एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वैशालीनगर परिसरात शस्त्रधारी गुंडांनी धुडगूस घालत एका दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या दुकानात तोडफोड करून गल्ल्यातील रोकड लंपास केल्याची घटना समोर आली आहे. दूध घेण्यासाठी दुकानात आलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यावरही आरोपींनी हल्ला केला. या संपूर्ण घटनेचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.

नेमके काय घडले?

वैशालीनगर येथे प्रदीप वर्मा यांचे दैनंदिन गरजेच्या वस्तूंचे दुकान आहे. रात्रीच्या सुमारास चार ते पाच शस्त्रधारी आरोपी दुकानात घुसले. त्यांनी शिवीगाळ करत दुकानातील साहित्याची तोडफोड सुरू केली.

याच वेळी वेदांत नावाचा महाविद्यालयीन विद्यार्थी दूध घेण्यासाठी दुकानात आला. आरोपींनी त्याच्यावरही हल्ला करत बेदम मारहाण केली. या हल्ल्यात वेदांतच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

Advertisement

त्यानंतर आरोपींनी दुकानातील गल्ल्यावरही डल्ला मारत रोकड घेऊन घटनास्थळावरून पोबारा केला. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

घटनेचे सीसीटीव्ही चित्रण पोलिसांच्या हाती लागले असून, त्याच्या आधारे एमआयडीसी पोलीस आरोपींची ओळख पटवून त्यांचा शोध घेत आहेत. शस्त्रांच्या धाकावर धुडगूस घालणाऱ्या आरोपींना पोलीस कधी जेरबंद करतात, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.या घटनेबाबत दुकानदार प्रदीप वर्मा यांनी आपली व्यथा मांडली असून, आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.