Published On : Sat, Jun 16th, 2018

नागपूर बातम्या : सुरेश भट सभागृहात वैशालीसह श्रोत्यांचा ‘स्वरजल्लोष’

Advertisement

नागपूर : नागपुरात काल स्वरतरंगाचे दशकपूर्ती आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सेलेब्रेटी प्लेबॅक गायिका वैशाली सावंत यांनां बोलावण्यात आले होते. वैशाली सावंत म्हणजे अवघ्या तरुणाईला वेड लावणारी गायिका. ती येणार म्हणून सुरेश भट सभागृह आधीच गर्दीने गच्च भरले होते. आपल्या खास अंदाजात मस्तीभरे गीत गाऊन सर्वांना थिरकवणारी वैशाली वाट पाहणाऱ्या श्रोत्यांची आतुरता संपवत ‘ चम चम करता है ये…’ गात मंचावर आली.

तेव्हा स्वरतरंग दशकपूर्तीच्या कार्यक्रमात एकाच जल्लोष उठून आला. स्वरातरंग अकादमीच्या दशकपूर्तीनिमित्त नागपूरमधील सर्वांचे लाडके गायक निरंजन बोबडे यांच्या संकल्पनेतून ‘स्वराजल्लोष’ या कार्यक्रमाचे आयोजन सुरेश भट सभागृहात करण्यात आले होते. या कार्यक्रमात ५ ते ६५ वयोगटातील जवळपास ३०० कलाकार उपस्थित होते.

निरंजन बोबडे यांनी आपल्या अनोख्या अंदाजात ‘कट्यार….’ मधील ‘यार इलाही’ ही कव्वाली सादर करून श्रोत्यांनां मंत्रमुग्ध केले. ऐश्वर्या नागराजन यांनी ‘मी राधिका मी प्रेमिका’ या गीताने कार्यक्रमाची सुरेल सुरवात केली. त्यानंतर ‘आओ हुजूर तुमको..’, मधुबन मी राधिका, घुमर, मन मंदिरा, रंग बारसे, मच गया शोर,एक चतुर नार, होतहो मी ऐसी बात, लांबी जुदाई, झिंगाट अश्या विविध अंदाजातील सर्व प्रकारची गाणी गायक कलाकारांनी उत्सुकतेने सादर केली. कार्यक्रमास माजी खासदार दत्त मेघे, गिरीश गांधी, आमदार सुनील सोले, डॉ. विलास डांगरे, शेफ विष्णू मनोहर उपस्थित होते.