Published On : Sun, Mar 21st, 2021

घोरपड ग्रामपंचायत अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना कोविड चे लसीकरण

कामठी :-, कामठी तालुक्यातील घोरपड ग्रामपंचायत अंतर्गत 60 वर्षावरील जेष्ठ नागरिकांना कोविंड लसीकरणाचे आयोजन कामठी उपजिल्हा रुग्णालयातील कोव्हाकॅसिन लसीकरण केन्द्रात करण्यात आले होते या लसीकरण शिबिरात काल शेकडो च्या वरील नागरिकांना लसीकरण करण्यात आले

तहसीलदार अरविंद हिंगे, कामठी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी अंशुजा गराटे ,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ संजय माने यांनी दिलेल्या आदेशानुसार घोरपड ग्रामपंचायतचे सरपंच तारा कडू, उपारपंच अनिकेत वानखेडे, समस्त ग्रा प सदस्य , कुणाल कडू व ग्रामविकास अधिकारी श्याम उंचेकर यांनी घरोघरी जाऊन घोरपड च्या साठ वर्षाच्या वरील ज्येष्ठ नागरिकांना कामठी उपजिल्हा रुग्णालयात कोविड लसीकरण करीता जाण्यासाठी विशेष वाहनाची सोय उपलब्ध करून देऊन स्वतः उपस्थित राहून शेकडो च्या वरील नागरिकांना लसीकरण करण्यात आले

सोबतच ज्या नागरिकांनी लसीकरण केले नाही त्यांना सुद्धा लसीकरणाचा लाभ घेण्याची विनंती सरपंच तारा कडू यांनी केली लसीकरण कार्यक्रमाचे यशस्वी आयोजनासाठी सरपंच तारा कडू, अनिकेत वानखेडे , निलेश ढोणे, आशा कुरडकर, प्रकाश खांडेकर, गीता पांडे,सुनीता कोर्वेकर ,भारती माणमुंडरे, रामपल्लवी जैस्वाल, तसेच कुणाल कडू यांनी परिश्रम घेतले. – संदीप कांबळे,कामठी