Published On : Sat, Oct 16th, 2021

१३ ते १६ ऑक्टोबर दरम्यान दीक्षाभूमीवर ११८२ जणांचे लसीकरण

नागपूर : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर येणाऱ्या अनुयायांच्या सुरक्षेच्या दृष्टीने नागपूर महानगरपालिकेतर्फे लसीकरण, कोरोना चाचणी, आरोग्य तपासणीसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. १३ ऑक्टोबरपासूनच दीक्षाभूमीच्या प्रवेश मार्गावर सहा केंद्र सेवारत होती. या केंद्रांवर १३ ते १६ ऑक्टोबर दरम्यान दिवसात ११८२ जणांना लसीकरणाचा डोस देण्यात आले. यात पहिला डोस ७१९ जणांना तर दुसरा डोस ४६३ जणांना देण्यात आला. तसेच ४४२१ जणांची कोव्हीड अँटीजेन चाचणी करण्यात आली. सोबतच ३०३ जणांची आरोग्य तपासणीही करण्यात आली.

महापौर दयाशंकर तिवारी व आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर यांच्या मार्गदर्शनात व आरोग्य अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरे, अतिरिक्त सहायक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी यांच्या सहकार्याने लक्ष्मीनगर झोनचे झोनल आरोग्य अधिकारी डॉ. सुनील कांबळे यांच्या नेतृत्वात मनपाच्या आरोग्य चमूने आरोग्य तपासणी, कोरोना चाचणी व लसीकरणाचे कार्य पार पाडले.

Advertisement

दीक्षाभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने ज्या अनुयायांचे लसीकरणाचे दोन्ही डोज पूर्ण झालेले नाही. त्यांच्यासाठी मनपाद्वारे चाचणीची व्यवस्था करण्यात आली होती. लसीकरण केंद्रांवरच लसीकरणाचा एक डोज घेतलेल्यांची कोरोना अँटीजेन चाचणी करून ज्यांचा अहवाल निगेटिव्ह प्राप्त होईल, त्यांना प्रवेश देण्यात येत असे. यादरम्यान एकूण ४४२१ अनुयायांची अँटीजेन चाचणी करण्यात आली. याशिवाय लसीकरण केंद्रांवर ३०३ अनुयायांची आरोग्य तपासणी करून त्यांना आवश्यक औषधोपचार सुद्धा करण्यात आले.

Advertisement

दीक्षाभूमीवर येणाऱ्या बौद्ध अनुयायांसाठी कोव्हिड लसीकरणाचे दोन डोज घेणे अत्यावश्यक करण्यात आले होते. ज्यांनी लसीकरणाचा एक डोज घेतला आहे व दुसरा डोज घेण्याचा अवधी पूर्ण झालेला आहे. अशांसाठी दीक्षाभूमीच्या परिसरात लसीकरण केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती. साहित्यभूषण अण्णाभाऊ साठे चौकामध्ये मनपाच्या नियंत्रण कक्षासह रहाटे कॉलनी चौक, काछीपूरा चौक, बजाजनगर चौक, लक्ष्मीनगर चौक आणि नीरी मार्ग अशा एकूण सहा ठिकाणी लसीकरण केंद्र उभारण्यात आले होते. नागरिकांनी मनपाच्या आवाहनाला प्रतिसाद देत नियमांतर्गत चाचणी करून, लस घेऊन दीक्षाभूमीमध्ये प्रवेश करून प्रशासनाला सहकार्य केले.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement