Published On : Fri, May 21st, 2021

आ.कृष्णा खोपडे यांच्या पुढाकाराने कळमना मार्केट येथे लसीकरण केंद्र सुरु

नागपूर : कळमना मार्केट येथे आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ असून या ठिकाणी जीवनावश्यक वस्तू (जसे धान्य, भाजी, मिरची व अन्य) च्या मोठ्या बाजारपेठ आहेत. या बाजारपेठांमध्ये जवळपास 20 हजार नागरिक, मजूरवर्ग व शेतकरी सतत कार्यरत आहेत. सतत सेवा देणा-या या मजूरवर्गाला, तसेच व्यापारी वर्गाला कोरोना पासून दूर राखण्यासाठी यांचे लसीकरण होणे अत्यंत आवश्यक आहे. याकरिता झोन भापती व स्थानिक नगरसेविका मनिषा अतकरे यांनी या ठिकाणी लसीकरण केंद्र सुरु करण्यासाठी अग्रणी भूमिका घेतली. त्यास अनुसरून आमदार कृष्णा खोपडे यांनी या ठिकाणी तातडीने लसीकरण केंद्र सुरु करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. त्या अनुषंगाने आज आमदार कृष्णा खोपडे यांनी कळमना मार्केट येथे लसीकरण केंद्राचे उदघाटन करण्यात आले.

मार्केटमधील व्यापारी, आड्तीया सर्वांनी स्वत: पुढाकार घेऊन आपले प्रतिष्ठानमध्ये कार्यरत कर्मचारी व मजूरवर्गाचे लसीकरण करून घ्यावे, अशी अपील आमदार कृष्णा खोपडे यांनी केली.

शेतकरी भवन येथे लवकरच कोविड केअर सेंटर होणार सुरु
कृषि उत्पन्न बाजार समिती, कळमना मार्केट येथे कोविड केअर सेंटर सुरु करण्याबाबत पणन संचालनालय, पुणे यांनी 29 एप्रिल 2021 रोजी परिपत्रक काढले आहे. त्या अनुषंगाने बाजार समितीच्या प्रशासकाने मनपा आयुक्त व जिल्हाधिकारी यांना 12 मे 2021 रोजी पत्र दिले आहे. मात्र अद्याप कसल्याही प्रकारची कारवाई प्रशासनाकडून झालेली नाही. करिता या ठिकाणी तातडीने कोविड केअर सेंटर सुरु करण्याबाबत कारवाई करावी.


फ्रंटलाईन वर्कर बाबत गाईडलाईन जाहीर करा
राज्यातील शासकीय व खाजगी सेवा देणारे फ्रंटलाईन वर्कर ज्यात वैद्यकीय सेवेशी निगडीत डॉक्टर, नर्स, फार्मासिस्ट, वैद्यकीय प्रतिनिधी (एम.आर.), अम्बुलंसचे वाहन चालक तसेच पत्रकार, सफाई कर्मचारी, बँक व सहकारी पतसंस्थांचे कर्मचारी, पोलीस विभागातील अधिकारी/ कर्मचारी, राशन दुकानदार, अनाज व किराणा व्यावसायी, पेट्रोलपंप वर काम करणारे व लॉकडाऊनच्या काळात अन्य विविध सेवा देणारे यापैकी अनेकांना अजूनही लस मिळालेली नाही. प्रशासनाने यासंदर्भात कसल्याही प्रकारची सूची व गाईडलाईन जाहीर न केल्यामुळे यांना लस घेण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. शासनाची ही भूमिका कोणत्याही दृष्टीने योग्य वाटत नाही. त्यामुळे फ्रंटलाईन वर्करची यादी व गाईडलाईन जाहीर करण्याची मागणी आमदार कृष्णा खोपडे यांनी केलेली आहे.

यावेळी उपमहापौर मनिषा धावडे, लकडगंज झोन सभापती मनिषा अतकरे, नगरसेवक प्रदीप पोहाणे, राजकुमार सेलोकर, सरिता कावरे, चेतना टांक, अनिल गेंडरे, APMC चे प्रशासक भुसारी, सहायक आयुक्त साधना पाटील, वैद्यकीय अधिकारी रश्मि भैसारे, APMC चे उपसचिव मदन केदार, मुख्य निरीक्षक बागडे, संजय अवचट, मेघराज मैनानी, विवेक ठवकर, गोविंदा काटेकर, सुनिल सूर्यवंशी, अनिकेत ठाकरे व अनेकजण उपस्थित होते.