Published On : Tue, Jul 9th, 2019

‘आपली बस’चा अधिकाधिक वापर करावा!

Advertisement

महापौर नंदा जिचकार : विहीरगाव-बर्डी शहर बसचा शुभारंभ

नागपूर: सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अधिकाधिक वापर सुरू झाला तर शहरातील अपघातांवर नियंत्रण मिळविता येईल. शिवाय प्रदूषणावर मात करता येईल. याकरिता नागपूर शहरातील नागरिकांनी नागपूर महानगरपालिकेद्वारा संचालित ‘आपली बस’ या शहर बस सेवेचा अधिकाधिक वापर करावा, असे प्रतिपादन महापौर नंदा जिचकार यांनी केले. परिवहन समिती सभापती जितेंद्र (बंटी) कुकडे यांच्या मार्गदर्शन व सहकार्याने सदर शहर बस सेवा सुरू करण्यात आली आहे.

Gold Rate
02 july 2025
Gold 24 KT 97,500 /-
Gold 22 KT 90,700 /-
Silver/Kg 1,06,600/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नागपूर महानगरपालिका परिवहन विभागाच्या वतीने मंगळवारी (ता. ९) विहीरगाव-बर्डी-विहीरगाव या बसचा शुभारंभ महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी त्या बोलत होत्या. उमरेड मार्गावरील विहीरगाव येथील सुर्योदय अभियांत्रिकी महाविद्यालय येथे आयोजित छोटेखानी कार्यक्रमाला महापौर नंदा जिचकार यांच्यासह परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप, प्रशासकीय अधिकारी रवींद्र पागे, परिवहन विभागाचे रामराव मातकर, योगेश लुंगे, योगेश नवघरे, हेमंत कावळे, श्री. चाफले, सुर्योदय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य चंद्रकांत रागीट, रवि दांडगे, निशांत आकांत उपस्थित होते.

महापौर नंदा जिचकार यांनी हिरवी झेंडी दाखवून विहीरगाव-बर्डी-विहीरगाव या नव्या मार्गावरील बसचा शुभारंभ केला. सदर बस आऊटर रिंग रोडपर्यंत बहादुरा फाटा मार्गे प्रवास करेल. सदर बसच्या बर्डीवरून सकाळी ७.३० पासून रात्री ८.२० पर्यंत एकूण आठ फेऱ्या असतील तर विहीरगाव येथून सकाळी ८.३० ते रात्री ९.३० पर्यंत अशा एकूण आठ फेऱ्या असतील. १६.३ कि.मी.च्या मार्गावरील पूर्ण भाडे ३३ रुपये तर अर्धे भाडे १७ रुपये असेल, अशी माहिती परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप यांनी दिली. यावेळी सुर्योदय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राध्यापक, राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, विहीरगाव येथील गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement
Advertisement