Published On : Thu, Sep 29th, 2022
By Nagpur Today Nagpur News

प्लास्टिक ऐवजी ‘कापडी पिशवी’चा वापर करा : जोशी

Advertisement

– पर्यावरण रक्षणासाठी पुढे येणाचे आवाहन

नागपूर : राज्य शासनाने प्लास्टिक बंदीचा निर्णय लागू केल्यापासून नागपूर महानगरपालिका हद्दीत प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवी बाळगणाऱ्या व विक्री करणाऱ्यांवर उपद्रव शोध पथकाच्या माध्यमातून दंडात्मक कारवाई केल्या जात आहे. प्लास्टिक बंदीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी प्लास्टिक पिशवी ऐवजी कापडी पिशवीचा वापर सुरू करावा असे आवाहन नागपूर महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त श्री राम जोशी यांनी केले आहे.

Gold Rate
Feb 18 th, 2026 - Time 11.45Hrs
Gold 24 KT ₹ 1,53,700 /-
Gold 22 KT ₹ 1,42,900 /-
Silver/Kg ₹ 2,40,700 /-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

सिंगल युज्ड प्लास्टिक पिशवी पर्यावरणासाठी घातक आहे. पर्यावरण रक्षणासाठी प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणे टाळायला हवे. त्यावर कापडी पिशवी एक उत्तम पर्याय होऊ शकते. याकरिता नागपूर महानगरपालिकेने इको फ्रेंडली लिविंग फाउंडेशन, स्वच्छ असोसिएशन सारख्या स्वयं सेवी संस्थांसोबत मिळून कापडी पिशव्यांना प्रोत्साहन देण्याचे ठरविले आहे. यासंदर्भात मनपा अतिरिक्त आयुक्त श्री राम जोशी यांचा कक्षात इको फ्रेंडली लिविंग फाउंनडेशनचे विजय लिमये यांनी श्री राम जोशी यांची सदिच्छ भेट घेतली. यावेळी उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे, मनपा शिक्षण विभागाचे श्री दिघोरे उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना अतिरिक्त आयुक्त श्री. राम जोशी सांगितले की, प्लास्टिक बंदीची नागपूर महानगरपालिके मार्फत काटेकोर अंमलबजावणी केल्या जात आहे. शहरातील नागरिकांनी प्लास्टिक बंदीच्या पार्श्वभूमीवर प्लास्टिक पिशवी ऐवजी कापडी पिशवीचा वापर सुरू करायला हवा, कापडी पिशवी हा प्लास्टिक पिशवीचा चांगला पर्याय आहे. त्यामुळे रोजगार निर्मितीही होईल तसेच या पिशव्या पुन्हा पुन्हा वापरता येतील. या पिशव्या अत्यंत माफक दारात उपलब्ध होतात.

कापडी पिशवी बद्दल माहिती देत इको फ्रेंडली लिविंग फाउंडेशनचे विजय लिमये यांनी सांगितले की, इको फ्रेंडली लिविंग फाउंनडेशन ही संस्था नागरिकांकडून जून्या वापरलेल्या साड्या, दुपट्टे, बेडशीट, पॅन्ट पीस, शर्ट पीस, पडदे आदी कापड घेऊन त्याच्या पिशव्या तयार करते. या पिशव्याचा पुन्हा पुन्हा वापर होऊ शकतो तसेच या पिशव्या अत्यन्त माफक दारात उपलब्ध होतात. त्यामुळे विक्रेते आणि ग्राहक दोघांसाठी फायदेचे आहे. पुढील काळात तरी नागरिकांनी अधिकाधिक प्रमाणात घरातील साड्या, दुपट्टे, बेडशीट, पॅन्ट पीस, शर्ट पीस, पडदे आदी कापड संस्थेला द्यावे अशी विनंती त्यांनी केली. या उपक्रमामध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी अधिक माहितीसाठी विजय लिमये यांच्याशी ९३२६०४०२०४ या मो. क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन अतिरिक्त आयुक्त श्री. राम जोशी केले.

मनपा कर्मचाऱ्यांनी सहभागी व्हा
प्लास्टिक बंदीच्या पार्श्ववभूमीवर नागरिकांनी प्लास्टिक पिशवीऐवजी कापडी पिशवीचा वापर सुरू करावा , या उद्देशातून या उपक्रमात मनपा कर्मचाऱ्यांनी सहभागी व्हावं व आपले कडील जुन्या साडया, बेडशिटस या संस्थेला दान कराव्या, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त श्री राम जोशी यांनी केले आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement