Published On : Mon, May 18th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात खळबळ;घटस्फोटाच्या नोटिशीनंतर राग अनावर,पत्नीच्या मित्राची हत्या!

नागपूर : शहरात नातेसंबंध, संशय आणि रागातून घडलेल्या धक्कादायक खुनाच्या घटनेने खळबळ उडाली आहे. पत्नी आणि तिच्या कॉलेज मित्राच्या मैत्रीवर संशय घेणाऱ्या पतीने लोन एजंटची निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. क्राइम ब्रँचने या प्रकरणाचा पर्दाफाश करत दोघांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूरमध्ये घडलेल्या या घटनेत आरोपी उमंग दडवे आणि त्याचा साथीदार संदेश भोसले यांनी मिळून अजय श्रीवास याची हत्या केली. मृत अजय हा आरोपीच्या पत्नीचा कॉलेज काळातील मित्र होता आणि दोघांमध्ये नियमित संपर्क असल्याचा संशय आरोपीला होता.

Gold Rate
May 14- 2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 159,100 /-
Gold 22 KT ₹ 1,48,000 /-
Silver/Kg ₹ 2,70,400/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

घरगुती वाद आणि वाढता संशय यामुळे पती-पत्नीमध्ये सातत्याने तणाव निर्माण होत होता. मुलाच्या वाढदिवसानंतर झालेल्या वादानंतर पत्नी माहेरी गेली आणि तिने पतीविरुद्ध तक्रार दाखल केली. त्यानंतर आरोपीला तलाकाची नोटीस मिळाल्याने त्याचा राग अधिक वाढल्याचे तपासात समोर आले आहे.

तपासात असेही समोर आले की पत्नीच्या अतिरिक्त सिमकार्ड आणि सततच्या संवादामुळे आरोपीचा संशय अधिक गडद झाला. त्यानंतर आरोपीने रेकी करून नियोजनबद्ध पद्धतीने फ्लॅटमध्ये घुसून धारदार शस्त्राने हल्ला करत हत्या केली.
घटनेनंतर दोन्ही आरोपी शांतपणे घटनास्थळावरून निघून गेले. मात्र तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे क्राइम ब्रँच युनिट-2 ने दोन्ही आरोपींना अटक केली. पुढील तपास गिट्टीखदान पोलीस करत आहेत.

नागपूरमध्ये घडलेली ही घटना नात्यांतील संशय आणि राग किती भीषण वळण घेऊ शकतो, याचे गंभीर उदाहरण ठरत आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement