Published On : Tue, Feb 18th, 2020

उपराजधानीतून लवकरच तेजस एक्स्प्रेस!

Advertisement

– आयआरसीटीसी तर्फे गंगा-यमुना व वैष्णोदेवी दर्शन यात्रा, सह महाव्यवस्थापक एन. संजीवाह यांची माहिती, तेजसमध्ये विमानासारखी सुविधा

नागपूर: नागपूर देशाच्या हृदयस्थानी आहे.नागपुरला आगळे वेगळ महत्व आहे. नागपूर जंक्शन आहे. त्यामुळे भविष्यात उपराजधानीतूनही तेजस एक्स्प्रेस धावेल. मात्र, कधी धावेल हे निश्चिन नाही. तेजस चालविण्याच्या तीन महिण्याआधी स्टेशनची माहिती दिली जाईल, अशी माहिती आयआरसीटीसीचे सह महाव्यवस्थापक एन. संजीवाह यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

आयआरसीटीसीतर्फे गंगा-यमुना व वैष्णोदेवी दर्शन यात्रेसंबधी माहिती देण्यासाठी ते नागपुरात आले होते. यावेळी तेजस एक्स्प्रेसविषयी प्रश्न विचारला असता ते बोलत होते. देशभरात १५० तेजस एक्स्प्रेस चालणार अशी घोषणा यंदाचा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. तत्पूर्वी दिल्ली – लखनउ या मार्गावर तेजस एक्स्प्रेस चालविण्यात आली. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर मुंबई – अहमदाबाद मार्गाने तेजस चालविण्यात आली. आता म्हणजे १६ एप्रिलला तेजस एक्स्प्रेसचा इंदोरहून शुभारंभ झाला. ही गाडी इंदोर – वारानशी अशी धावते. यानंतर नागपुरचा विचार होवू शकतो. तेजस एक्स्प्रेस भारतातील पहिली खाजगी ट्रेन आहे. या गाडीला विमानासारखी सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे या गाडीत बसण्याची अनेकांची ईच्छा आहे.

आयआरसीटीसीतर्फे भारत तीर्थ दर्शन योजनेंतर्गत गंगा-यमुना दर्शन यात्रा व वैष्णोदेवी उत्तर भारत यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. दोन्ही यात्रांचा कालावधी ११ दिवस आणि १० रात्रींचा असणार आहे. प्रत्येकी १२ स्लिपर कोच असणाèया दोन स्वतंत्र रेल्वेगाड्यांव्दारे यात्रा होणार आहेत. वैष्णो देवी यात्रेसाठी सुटणारी रेल्वे १० मार्चला रात्री ११ वाजता नागपूरला पोहोचेल. आग्रा, मथुरा, दिल्ली, हरिद्वार, जम्मू, अमृतसर, वाघा बार्डर आदी ठिकाणांना भेटी देऊन रेल्वे १९ मार्चला रात्री ९ वाजता नागपूरला पोहोचेल. या यात्रेसाठी प्रतीव्यक्ती १० हजार ९२० रुपयांचे शुल्क निश्चित करण्यात आले आहे.

भाविकांनी यात्रांचा लाभ घेण्याचे आवाहान आयआरसीटीसीचे सह महाव्यवस्थापक एन. संजीवाह, पवन सेंगर व दीपाली नारनवारे यांनी केले आहे.

गंगा-यमुना दर्शन यात्रा
याचप्रमाणे गंगा-यमुना दर्शन यात्रेसाठी जाणारी रेल्वे २५ फेब्रुवारीला रात्री ११ वाजता नागपूरला पोहोचेल. प्रवाशांना घेतल्यानंतर आग्रा, मथुरा, दिल्ली, हरिद्वार, प्रयागराज, वाराणसी, गयाला भेट देऊन ही रेल्वे ५ मार्चला रात्री ११ वाजता परतेल. या यात्रेसाठी प्रतीव्यक्ती शुल्क १० हजार ३९५ रुपये निश्चित करण्यात आले आहे.