Published On : Tue, Feb 18th, 2020

लोककलांच्या सादरीकरणाने छत्तीसगडी महोत्सवाचा समारोप

नागपूर : छत्तीसगडी लोककलावंत सादर केलेल्या लोककलांच्या सादरीकरणाने छत्तीसगडी महोत्सवाचा शानदार समारोप सोमवारी (ता. १७) झाला.

नागपूर महानगरपालिकेच्या वतीने डिपटी सिग्नल मंडई मैदानावर तीन दिवसीय छत्तीसगडी लोककला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. विविध छत्तीसगडी कलांचे दर्शन आणि छत्तीसगडी संस्कृतीची ओळख करवून देणाऱ्या या महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमाला आमदार प्रा. अनिल सोले, आमदार मोहन मते, माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महोत्सवाचे संयोजक स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे, भाजपचे शहर अध्यक्ष माजी महापौर प्रवीण दटके, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, लकडगंज झोन सभापती राजकुमार सेलोकर, नगरसेविका चेतना टांक, सरिता कावरे, नगरसेवक अनिल गेंडरे उपस्थित होते.

यावेळी उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सर्व लोककलावंतांचा सत्कार करण्यात आला.

यानंतर छत्तीसगडचे प्रख्यात कलावंत गोरेलाल बर्मन, दिलीप षडंगी, अरुण साहू, पूनम तिवारी, दीपक अर्जुनदा यांनी सादर केलेल्या कार्यक्रमाने रसिक मंत्रमुग्ध झाले. उपस्थित छत्तीसगडी बांधवांनी त्यांना भरभरून दाद दिली. यावेळी भारत सारवा, मनोज अग्रवाल, हर्षद घटोले, शुभम पाटील, शंकर गौर, ईश्वर कावरे, अजहर अली, शैलेश नैताम, कमलेश शाहू, लोकेश बावनकर, अजित कौशल, प्रतीक वैद्य आदी उपस्थित होते.