Published On : Fri, Aug 9th, 2019

आगामी सण उत्सवादरम्यान शहरात कायदा व्यवस्था ठेवण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे -डीसीपी निलोत्पल

Advertisement

कामठी: आगामी काळात होणारे बकरी ईद सह विविध सण उत्सवादरम्यान विविध जाती-धर्माच्या नागरिकांनी एकत्र येऊन सण ,उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करून शहरात कायदा सुव्यवस्था ठेवण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आव्हान पोलीस उपायुक्त नीलोत्पल यांनी नवीन कामठी जुनी कामठी पोलीस स्टेशन च्या संयुक्त विद्यमाने नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या सभागृहात आयोजित शांतता समितीच्या सभेत मार्गदर्शन करताना व्यक्त केले .

यावेळी सहायक पोलिस उपायुक्त राजेश परदेशी, नवीन कामठीचे ठाणेदार संतोष बकाल ,जुनी कामठीचे ठाणेदार किशोर नगराळे ,दुय्यम पोलीस निरीक्षक देविदास कठाळे उपस्थित होते. ,सभेत नगरसेविका सुषमा शिलाम , नगरसेवक आरिफ कुरेशी ममता कांबळे ,नीतू जोशी ,इक्बाल कुरेशी, वरिष्ठ पत्रकार चंद्रकांत चौबे यांनी आगामी बकरी ईदच्या पर्वावर शहरात भारनियम, विविध मार्गावरील खड्डे व रस्त्यावर पडलेले साहित्य त्वरित हटवून त्यावर उपाय योजना नगर परिषद प्रशासनाने करण्याची मागणी केली ,सभेत मार्गदर्शन करताना पोलिस उपायुक्त निलोतपल म्हणाले आपण मांडलेल्या विविध सूचना, समस्या बकरी ईदच्या पूर्वी संबंधित विभागा मार्फत सोडवण्यात येतील सोबतच आगामी येणारे विविध सण ,उत्सव विविध जाती धर्माच्या नागरिकांनी एकत्र येऊन सण-उत्सव साजरे करून राष्ट्रीय एकात्मता निर्माण करावी व शहरात कायदा सुव्यवस्था ठेवण्यासाठी सहकार्य करण्याचे आव्हान केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक नवीन कंपनीचे ठाणेदार संतोष बकाल यांनी केले, संचालन जुनी कामठी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नगराळे यांनी केले व आभार प्रदर्शन गुन्हे पोलीस निरीक्षक देवोदास कठाळे यांनी मानले.

सभेला बबलू तिवारी, विद्युत वितरण कंपनीचे उप अभियंता दिलीप मदने,नगरपरिषद स्वास्थ निरीक्षक विजय मेथीया, ,राकेश फेडर सह पोलीस विभागातील समाधान पांढरे, अश्वजित फुले, मयूर बन्सोड यासह गणमान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संदीप कांबळे कामठी