Published On : Fri, Aug 9th, 2019

कामठी नगर परिषद सफाई कर्मचाऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी शिबिर

Advertisement

कामठी : 9 ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून कामठी नगर परोषद सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्यात्मक दृष्टिकोनातून राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र न.प.कामठी च्या वतीने नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात सफाई कर्मचाऱ्यांचे मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.या मोफत आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद प्राप्त झाला असून शिबिरात समस्त सफाई कर्मचाऱ्यांचे कॅन्सर तपासणी व रक्त तपासणी करण्यात आली तसेच रक्तदाब, अस्थमा, दन्तरोग, एचआयव्ही आदी रोगांची मोफत तपासणी करण्यात आली.

या मोफत आरोग्य निदान तपासणी शिबिराचे उदघाटन नगराध्यक्ष मो शाहजहा शफाअत यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.याप्रसंगी उपाध्यक्ष शाहिदा कलिम अन्सारी, आरोग्य सभापती ममता कांबळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ अश्विनी फुलकर, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारो डॉ शबनम खानुनो, स्वास्थ्य निरीक्षक विजय उर्फ गफ्फु मेथीयां, सफाई कर्मचारी युनियन अध्यक्ष किशोर पांडे, दन्तरोग तज्ञ डॉ झरीश अख्तर, मेडिसिन तज्ञ डॉ कदम आदी प्रामुख्याने उपस्थित होते.या शिबिराला एचसीजी कॅन्सर हॉस्पिटल नागपूर चे संचालक डॉ अजय मेहता, डॉ सुचित्रा मेहता, डॉ राहुल कोसारे यांच्या वैद्यकीय चमूने विशेष आरोग्य सेवा पुरविली .

या शिबिराच्या यशस्वीतेसाठी तालुका आरोग्य अधिकारो डॉ अश्विनी फुलकर, नागरी प्रथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ शबनम खाणुनी, विशाल माटे, स्वाती वाघमारे, कोमल जवादे, स्वीटी रामटेके, सुमित्रा वाघधरे, रंजना कवरती, स्वाती भवसागर, प्रियंका जंगी, राहिता बेगम, सुनीता तिजारे, सत्यप्रभा मेंढे, सुषमा दिवानजी, राजू कुकुर्डे, अनिल नान्हे आदींनी मोलाची भूमिका साकारली

संदीप कांबळे कामठी