Published On : Tue, Jul 30th, 2019

आगामी निवडणुका ” बँलेट पेपर” द्वारे घेण्यात याव्या

कन्हान : – पारशिवनी चे नायब तहसिलदार व तालुका निवडणुक अधिकारी हयाना युवक कॉंग्रेस व्दारे निवेदन देऊन होण्या-या जिल्हा परिषद व पंचायत समिती,नगर पारिषद, विधानसभा निवडणुका बैलेट पेपर व्दारे घेण्यात याव्या अशी मागणी करण्यात आली.

सोमवार (दि.२९) ला पारशिवनी चे नायब तहसिलदार व तालुका निवडणुक अधिकारी मा,सय्याम यांच्या मार्फत शासनाकडे युवक कॉंग्रेस व्दारे निवेदन देऊन आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत सामिती नगर परिषद विधानसभा निवडणुका ईव्हीएम मशीन चा उपयोग न करता बॅलेट पेपर वर निवडणुका घेण्यात याव्या अशी मागणी शासनाकडे करण्यात आली.

अन्यथा आंदोलन चा ड्शारा केला जाईल असा शिष्टमंडळात युवक काँग्रेस चे अमोल प्रसाद, सतीश भसारकर, शक्ती पात्रे, मनीष भिवगडे, प्रदीप दियेवार, चेतन देशमुख, संकेत पनवेलकर्, कृष्णा खेरगड़े, अमोल गिरदकर, निखिल येवले, सुमित आदी पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.