| | Contact: 8407908145 |
  Published On : Tue, Jul 30th, 2019

  यशवंत विद्यालय वराडा व्दारे वृक्षदिंडी सह वृक्षारोपण

  झाडे लावा, झाडे जगवा।

  कन्हान : – यशवंत विद्यालय वराडा च्या विद्यार्थ्यांनी वृक्षदिंडी काढुन जनजागृती करित वृक्षारोपण करून “झाडे लावा, झाडे जगवा.” चा संदेश देण्यात आला .

  यशवंत विद्यालय वराडा येथे मुख्याध्यापिका सौ किर्ती निंबाळकर यांच्या हस्ते वृक्षाचे पुजन करून वृक्षदिंडी काढुन मनुष्याला जिवन जगण्याकरिता वृक्षापासुन पाणी व प्राणवायु (ऑक्सिजन) मिळत असल्याने वृक्ष हे मनुष्याची मुलभुत गरज पुर्ण करण्याचे महत्त्वाचे केंद्र आहे. यास्तव वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन करणे आधुनिक काळाची अत्यंत आवश्यक गरज निर्माण झाली आहे. याकरिता ” झाडे लावा, झाडे जगवा.

  चा संदेश देत परिसरात जनजागृती करून परिसरात व शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षदिंडी व वृक्षारोपण कार्यक्रमा च्या यशस्वीते करिता यशवंत विद्यालया तील शिक्षक राजेंद्र गभणे, राकेश गणवीर, सतिश कुथे, रोशन राऊत, मोतीराम रहाटे, दिपक पांडे, शिक्षिका अर्चना शिंगणे, रूपाली चिखले, अश्विनी खंडार सह गावकरी, प्रितिाष्ठित नागरिक ,शालेय विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145