Published On : Fri, Nov 27th, 2026
By Nagpur Today Nagpur News

वाशिमच्या समृद्धी महामार्गावर ८ ते १० वाहनांवर दगडफेक; प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

वनोजाजवळ अज्ञातांचा धुडगूस; वाहतूक एक तास ठप्प, पोलिसांकडून तपास सुरू
Advertisement

वाशिमच्या समृद्धी महामार्गावर ८ ते १० वाहनांवर दगडफेक; प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

वाशिम : समृद्धी महामार्गावर अज्ञात व्यक्तींनी ८ ते १० वाहनांवर दगडफेक केल्याची घटना घडली आहे. वाशिम जिल्ह्यातील वनोजा गावाजवळ टोल क्रमांक २०८ पासून कारंजाच्या दिशेने सुमारे दोन किलोमीटर अंतरावर रात्री ९.३० ते १० वाजताच्या दरम्यान हा प्रकार घडला. अचानक झालेल्या दगडफेकीमुळे वाहनचालक आणि प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

दगडफेकीच्या भीतीने अनेक वाहनचालकांनी महामार्गावरच वाहने थांबवली. त्यामुळे जवळपास अर्धा ते एक तास वाहतूक ठप्प झाली. घटनेची माहिती मिळताच मंगरूळपीर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. अज्ञात व्यक्तींनी वाहनांवर दगडफेक का केली, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.