होळी पंचमी पर्वावर मंगलवारी लावा येथे धावल्या बैला विना बंड्या
नागपूर/वाडी(अंबाझरी): वाडी येथून जवळच असलेल्या खडगाव मार्गावरील लावा गावात होळी च्या पंचमी ला दरवर्षी प्रमाणे बिना बैलाच्या बंड्या धावण्याची सात पिढ्यापासून ची परंपरा मंगळवार दि. 6 मार्च रोजी उत्साहात साजरी करण्यात आली. लाव्हा येथील गोरले परिवार द्वारा 200 वर्षोपासून हा कार्यक्रम उत्साह,त्योहार च्या रूपात सम्पन्न केल्या गेला. या प्रसंगी गावातील सर्व नागरिक एकत्रित होऊन कार्यक्रमला यशस्वी बनवितात. गोरले परिवारातील 7 व्या पिढीचे सदस्य 80 वर्षीय माधवराव गोरले या परंपरेला पुढे घेऊन जात आहे. माधवराव गोरले यांनी होळी च्या उपवास करून मंगळवारि पंचमीचे दिवशी सायंकाळी 4 वाजता हातात तलवार घेऊन आपल्या अनुयायी सोबत गावातील सोनबा बाबा मंदिरात गेले. तेथे पूजा, अर्चना आटोपून बकऱ्याचा बळी दिला.
त्यानंतर एक उंच झुल्यावर गोरले बाबा ला झोपविण्यात आले. थोड्याच वेळाने माधवराव तलवार घेऊन दही-भात समोर फेकून प्रथम क्रमांकाचे बंडीवर चढले. त्यांचे मागे इतर बंड्यावर 50 ते 60 भक्त एक दुसऱ्यांना पकडून उभे झाले. गोरले महाराजांनी हवेत तालावर फिरवून होकरे हो– होकरे हो अशी गर्जना केली. समोरच्या बंडीचे धूर 7 ते 8 भक्तांनी उचलले व बंड्या हळू हळू धावू लागल्या. मागो माग नागरिक धावू लागलेत.
लाव्हा येथून सोनबा नगर येथील पुरातन मंदिरात मार्ग क्रमान करून सामापण झाले. हा नाविन्यपूर्ण कार्यक्रम पाहण्यासाठी दूरवरून मोठ्या संख्येने नागरिक आले होते. लाव्हा गावाला यात्रेचे रूप आले होते. या कार्यक्रमाचे यशस्वीत्यासाठी उत्सव समितीचे पदाधिकारी व प्रतिष्टीत नागरिक गणेश पटेल हिरणवार, प.स.नागपूर उपसभापती सुजित नितनवरे, सरपंच जोत्सना नितनवरे, उपसरपंच महेश चोखंदरे, पूर्व सरपंच रॉबिन शेलारे, शेषराव गोरले, मोरेश्वर गोरले, दत्तू पैठणकर, ग्राम पंचायत लावा, पांडुरंग बोरकर, गजानन गोरले, शेषराव गोरले, राजन हिरणवार, कमलेश हिरणवार, मोरेश्वर वरठी, प्रकाश डवरे, भारत नितनवरे, बंडू ढोणे, मनोज तभाने, डॉ.उमेश फुलझले, मंगेश चोखंदरे, नंदलाल नितनवरे, रामकृष्ण धुर्वे, अशोक आगरकर, विठ्ठल आगरकर, नितीन गोरले, उमेश पोहनकर, जिजा धुर्वे, सिद्धर्थ धोंगडे, ग्राम विकास अधिकारी विकास लाडे आदींनी परिश्रम घेतले.
अंधश्रद्धा निर्मूलन समिती नागपूरने एका पत्राद्वारे माहिती दिली की या उत्सवात बंड्या बिना बैलाच्या धावत नाहीत,त्याला मानवी बल दिल्या जाते, हा काही चमत्कार नाही. विज्ञानाचे गती च्या नियमावर आधारित बल प्रतिक्रिया बल येथे कार्य करते. समितीने चमत्काराचे आधारावर बंड्या चालेल तर 25 लाख का पुरस्कार घोषित केला आहे. असे समिती चे प्रमुख उमेश बाबू चौबे, हरिष देशमुख, बबलू बहादूरे, उत्तम सुळके, विजय मोकाशी, सुनील वंजारी, एम व्ही.पारधी माहिती दिली.