Published On : Sat, Sep 23rd, 2017

बडनेराचे आमदार रवि राणा यांच्या गाडीवर अज्ञात इसमाचा हल्ला

वाडी (अंबाझरी) : नागपूर अमरावती महामार्गावर वडधामना परिसरात शनिवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास दोन अज्ञात दुचाकी हेल्मेट घालून हल्लेखोरांनी कारवर हल्ला केल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली,आमदार रवि राणा मुंबईवरून नागपूरला विमानतळावर पोहचत असल्याने त्यांना घेन्यासाठी त्यांची फारच्यून कार क्र.एम ‘ एच २७ बीई १ . त्यांचे खासगी सहाय्यक आश्विन उके युवा स्वाभीमान संघटनेचे जिल्हा अध्यक्ष शेखर बिषेंण व वाहणचालक सारंग ढोके नागपूरला पोहचले.परंतू रविराणा यांचे विमाण येण्यास उशीर असल्याने हे सर्व जन परत अमरावती महामार्गावरील गोंडखैरी येथे एका कार्यकात्याचे निधन झाल्याने त्याचे अंतिम संस्कारामध्ये सहभागी होण्यासाठी पोहचले, येथून ते पुन्हा नागपूरला विमानतळावर येण्यासाठी निघाले असता अमरावती महामार्गावरील वडधामना येथील होटल शहंनशाह समोर मागुन एका दुचाकीवर दोघे इसमांनी येऊन हे वाहण थांबविले व आतमध्ये आमदार रवि राणा असल्याचे समजून कारवर रॉकेल सदृष्य तरल पदार्थ फेकून व कारच्या समोरील काचा दगडफेकून फोडल्या.

अचानक घटना झाल्याने वाहणातील सर्वजन घाबरून गेले ते बाहेर निधेपर्यंत हे दोघेही पसार झाले. कारमधील या घटनेची माहीती मोबाईलवरून आमदार रवि राणा व वाडी पोलीस अधिकाऱ्यांना दिली . ही माहीती समजताच पोलीस विभागात खळबळ निर्माण झाली, वाडी पोलीस घटनास्थळी पोहचून घटना समजून घेतली.

या सर्वांनी वाडी पोलीस स्टेशनला पोहचून या घटनेची तक्रार नोंदविली सायंकाळी जेव्हा आ. रवि राणा मुंबईवरून नागपूरला पोहचताच वाडी पो. स्टे. गाठून पोलिसांकडे आरोपीवर कठोर कार्यवाहीची मागणी केली वाडीतील पत्रकारांनी या संदर्भात आ. रवि राणा यांच्याशी चर्चा करून माहीती घेतली असता हा भ्याड हल्ला शिवसेनेच्या कार्यकात्यांनी केल्याचा संशय व्यक्त केला.वाडी पो. स्टेशन ने अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
राज्यातील विपरीत राजकारणाचा परिणाम असल्याची चर्चा दिसूनआली.