Published On : Wed, Mar 28th, 2018

युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीने सामाजिक उत्तरदायित्व बजावलेः सीएसआर अंतर्गत मूक आणि बधीर शाळेस घेतले दत्तक


नागपूर: सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपनी असलेल्या युनायटेड इंडिया ईन्शुरन्सतर्फे कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी (सी.एस.आर.) अंतर्गत स्थानिक शंकरनगर स्थित मुक व बधीर शाळा दत्तक घेण्याचा कार्यक्रम आज आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागपूर महानगर पालिकेच्या धरमपेठ झोनच्या सभापती श्रीमती रूपा रॉय होत्या तर युनायटेड इंडिया ईन्शुरन्स नागपूर विभागीय कार्यालयाचे मुख्य क्षेत्रीय व्यवस्थापक श्री. रघुनाथ सिंह मीना ,नायब तहसीलदार श्री. पाठक , शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती कमल वाघमारे व प्रबंधक श्री. आर.एन. मिश्र याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते.

श्री. मीना यांनी सीएसआर अंतर्गत गाव तसेच शाळा दत्तक घेऊन त्यांना मुलभूत सेवा प्रदान करण्याच्या कार्यक्रमासंदर्भात युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या भुमिकेचे यावेळी विवेचन केले . युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी सामाजिक उत्तरदायित्व पार पाडण्यासाठी कटिबद्ध आहे असे त्यांनी यावेळी सांगितले. धरमपेठेतील या शाळेला 1 लाख रुपयाचे आवश्यक सामग्री प्रदान करण्यात येणार असून यामध्ये थंड पाण्याचे जलशुद्‌धीकरण यंत्र, संगणक कक्षासाठी फिरत्या खुर्च्या, पोर्टेबल म्युझिक सिस्टीम व अन्य शालेय सामानाचा समावेश आहे.


कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती रुपा रॉय यांनी आपल्या भाषणात युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या कार्याचे कौतुक करत कॉर्पोरेट क्षेत्रातील कंपन्यानीही असे मदत कार्य करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले. धरमपेठ झोनच्या सभापतीच्या नात्याने या शाळेच्या दिव्यांग विद्यार्थ्यांकरता आश्यक ते सर्व सहकार्य आपण करु , असेही त्यांनी सांगितले .

युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक श्री. आर एन. मिना आणि सी. एस. आर. विभागाचे प्रधान अधिकारी व सहायक व्यवस्थापक श्री. प्रदीप अवचट यांनीही आपले मनोगत यावेळी व्यक्त केले.

या कार्यक्रमा प्रसंगी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले तसेच सामान्य विमा व इतर ज्वलंत मुद्द्यावर आधारित प्रश्नमजुंषा स्पर्धच्या विजेत्यांना सन्मानितही करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कंपनीचे अधिकारी श्री. सूर्यप्रकाश. श्री.हर्षल धनविजय , स्नेहल मेश्राम तसेच शाळेच्या शिक्षक श्रीमती सरिता पटवर्धन व नंदू पडोले यांनी सहकार्य केले.