Published On : Fri, Jun 11th, 2021

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा दौरा

भंडारा :- परिवहन, महामार्ग, सुक्ष्म-लघू-मध्यम उद्योग विभाग भारत सरकार केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी हे 11 जून 2021 रोजी भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

दुपारी 2.00 वाजता मौदा जि. नागपूर येथून मोटारीने देव्हाडा ता. तुमसरकडे प्रयाण. दुपारी 3.00 वाजता वैनगंगा साखर कारखाना (मानस युनिट क्र.-4) येथे आगमन व राखीव. सायंकाळी 6.30 वाजता देव्हाडा येथून मोटारीने भंडाराकडे प्रयाण. सायंकाळी 7.00 वाजता खासदार सुनिल मेंढे यांच्या निवासस्थानी भेट व राखीव. रात्री 7.30 वाजता भंडारा येथून नागपूरकडे प्रयाण करतील.