Published On : Sat, Jun 29th, 2019

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घेतला विविध कामांचा आढावा

Advertisement

नागपूर : शहरात सुरू असलेल्या विविध विकास कामांचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी (ता.२९) आढावा घेतला.वनामती येथे आयोजित आढावा बैठकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह उपमहापौर दीपराज पार्डीकर, आमदार सुधाकर देशमुख, आमदार सुधाकर कोहळे, आमदार कृष्णा खोपडे, आमदार विकास कुंभारे, आमदार डॉ. मिलींद माने, स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे, सत्ता पक्षनेता संदीप जोशी, ज्येष्ठ नगरसेवक प्रवीण दटके, नागपूर मेट्रो कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक ब्रजेश दीक्षित, जिल्हाधिकारी अश्वीन मुदगल, मनपा आयुक्त अभिजीत बांगर, नागपूर सुधार प्रन्यासच्या सभापती शितल उगले, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे चंद्रशेखर, वनामतीचे संचालक व मनपाचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता उल्हास देबडवार, अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख यांच्यासह मनपा, मेट्रो व नागपूर सुधार प्रन्यासचे विविध विभागाचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

बैठकीमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेची सद्यस्थिती, नागपूर सुधार प्रन्यासने मनपाला लेआउट हस्तांतरण करण्याबाबत घ्यावयाचा धोरणात्मक निर्णय, शहरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी ग्रीनजिम साहित्य उपलब्ध करण्याबाबत सद्यस्थिती अहवाल, शहरातील खेळांचे मैदान विकसीत करण्याबाबतची सद्यस्थिती, शहरात ‘साई’ प्रकल्पाच्या जमीनीबाबत धोरणात्मक निर्णयाची अंमलबजावणी करणे, शहरात यशवंत स्टेडियम, सक्करदरा बाजार, बुधवार बाजार, सोख्ता भवन, भाजी मार्केट बाबत सद्यस्थिती, शहरातील सिमेंट रस्ते, चौक सौंदर्यीकरण, वृक्ष लागवड याबाबत धोरणात्मक निर्णय घेणे, केळीबाग रोड, जुना भंडारा रोड, पारडी उड्डाणपूल येथील रस्त्यांच्या भूसंपादनाबाबत सद्यस्थिती अहवाल, शहरातील अमृत योजनेच्या कामाची सद्यस्थिती अहवाल, शहरातील झोपडपट्टीवासीयांना मालकी हक्काचे पट्टे देण्याबाबत सद्यस्थिती अहवाल, शहरातील कचरा व्यवस्थापन व इंदूर पॅटर्नबाबत सद्यस्थिती अहवाल, नाग नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्पाबाबत सद्यस्थिती अहवाल, नागपूर मेट्रो रेल्वेच्या कामाबाबत सद्यस्थिती तसेच नागपूर महानगरपालिका, नागपूर सुधार प्रन्यास आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांचेकडून मेट्रोला हस्तांतरीत करण्यात आलेल्या प्रकल्पांच्या हस्तांतरण कराराची सद्यस्थिती, ऑरेंज सिटी स्ट्रीट प्रकल्पाबाबत सद्यस्थिती, फुटाळा तलावात जलक्रीडा प्रकल्प चालविण्याबाबत सद्यस्थिती आदी विषयांचा यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आढावा घेतला.

प्रत्येक व्यक्तीचे स्वत:च्या घराचे स्वप्न असते त्यासाठी शहरात प्रधानमंत्री आवास योजनेतून ५० हजार घरे बांधण्याचे लक्ष्य आहे. यामध्ये येणा-या त्रुट्या दूर याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले. नागपूर सुधार प्रन्यासने मनपाला लेआउट हस्तांतरण करण्याच्या विषयाबात जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त व नागपूर सुधार प्रन्यासच्या सभापतींनी योग्य निर्णय घेउन विषय पूर्णत्वास नेण्याचेही त्यांनी निर्देशित केले. शहरात ज्येष्ठ नागरिकांसाठी पहिल्या टप्प्यात २८ ठिकाणी ग्रीन जिम साहित्य लावण्याचे काम पूर्ण झाले आहे. तर दुस-या टप्प्यात २८ ठिकाणी साहित्य लावण्याचे काम सुरू असून उर्वरित सर्व ठिकाणी १५ ऑगस्टपर्यंत काम पूर्ण करण्याचेही निर्देश ना. नितीन गडकरी यांनी दिले. शहरामध्ये क्रीडा वातावरण निर्मितीसाठी प्रयत्न सुरू असून शहरातील खेळाडूंना क्रीडांगणे उपलब्ध व्हावेत यासाठी क्रीडांगणांचा विकास करणे आवश्यक आहे. याबाबत खासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजक व शहरातील द्रोणाचार्य पुरस्कार विजेते भाउ काणे यांच्याशी चर्चा करून कार्य पूर्ण करणे, तसेच इतरही सर्व विषयांमधील अडथळे दूर करून आवश्यक ती कार्यवाही तातडीने करण्याचे निर्देश केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी दिले.