Advertisement
नागपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सूक्ष्म, मध्यम व लघु उद्योगाचे बळकटीकरण करण्याच्या हेतूने किरकोळ आणि घाऊक व्यापार एमएसएमईच्या कक्षेत आणण्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली.
यापूर्वी किरकोळ आणि घाऊक व्यापार एमएसएमईच्या कक्षेत नव्हता. त्यामुळे या क्षेत्रातील व्यापार्यांना शासनाच्या योजनांचे व एमएसएमईच्या योजनांचे फायदे मिळत नव्हते. रिझर्व्ह बँकेच्या सुधारित मार्गदर्शक सुचनांनुसार नव्याने प्राधान्य देण्यात आलेल्या व्यापाराला कर्जाच्या नूतनीकरणाचा फायदाही मिळणार
आहे.
किरकोळ आणि घाऊक व्यापाराला देशातील अर्थव्यवस्थेच्या विकासाचे इंजिन बनविण्यासाठी आम्ही कटिबध्द आहोत. तसेच या मार्गदर्शक सूचनांचा लाभ सुमारे अडीच कोटी किरकोळ आणि घाऊक व्यापार्यांना होईल, याकडेही ना.गडकरी यांनी लक्ष वेधले.
Advertisement